इम्प्रूव्ह युअरसेल्फ : प्रश्‍न फावल्या वेळेचा...

रमेश सूद
Thursday, 8 October 2020

‘सर, आपणाला ज्या दिवशी फारसे काम नसते, पुरेसा मोकळा वेळ हातात असतो, त्या वेळी दिवसभर तुम्ही काय करता? तुम्हाला कंटाळा नाही का येत?’ नुकत्याच ‘एमबीए’ झालेल्या एका युवकाने मला हा प्रश्‍न विचारला. प्रश्‍न ऐकून मला गंमत वाटली, मला त्या प्रश्नाचे उत्तर देणे क्रमप्राप्तच होते. मी त्याला म्हणालो, ‘मला तुला काही शेअर करायचे आहे. मी सकाळी लवकर उठतो आणि उठल्याबरोबर उगवत्या सूर्याला आणि आकाशाला नमस्कार करतो. त्यानंतर मॉर्निंग वॉकला बाहेर पडतो.

‘सर, आपणाला ज्या दिवशी फारसे काम नसते, पुरेसा मोकळा वेळ हातात असतो, त्या वेळी दिवसभर तुम्ही काय करता? तुम्हाला कंटाळा नाही का येत?’ नुकत्याच ‘एमबीए’ झालेल्या एका युवकाने मला हा प्रश्‍न विचारला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रश्‍न ऐकून मला गंमत वाटली, मला त्या प्रश्नाचे उत्तर देणे क्रमप्राप्तच होते. मी त्याला म्हणालो, ‘मला तुला काही शेअर करायचे आहे. मी सकाळी लवकर उठतो आणि उठल्याबरोबर उगवत्या सूर्याला आणि आकाशाला नमस्कार करतो. त्यानंतर मॉर्निंग वॉकला बाहेर पडतो. निसर्गाचे सकाळच्या काळातील संगीत ऐकतो. चालताना वाटेवरच्या ताज्या फुलांचा सुगंध घेतो. त्याच दरम्यान वाटेत भेटणाऱ्या व्यक्तींना हाय-हॅलो करतो. सकाळची उन्हाची कोवळी किरणे आणि शुद्ध हवा ग्रहण केल्यावर घरी परततो. अकराव्या मजल्यावर असलेल्या माझ्या फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये बसून समोर पसरलेल्या शहराकडे पाहून आनंदाने ‘हॅलो’ म्हणतो. त्यानंतर पत्नीसोबत चहाचा आनंद घेतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्याचवेळी वर्तमानपत्रांवर नजर टाकून काही बातम्यांचा आढावा घेतो. अशा पद्धतीने माझ्या रोजच्या दिवसाची सुरुवात होते. दिवसभरात मी वाचन, विचार, लिखाण करतो. त्याचबरोबर देश-विदेशातून येणारे फोन घेत त्याद्वारे काही विचार संबंधितांबरोबर शेअर करतो. दरम्यानच्या काळात माझे काही प्रेझेंटेशन अपडेट करतो, वेगवेगळ्या लोकांनी विचारलेल्या शंकांमधून वेगळ्या आणि आश्‍चर्यकारक वाटणाऱ्या गोष्टी लक्षात घेऊन काही प्रेझेन्टेशच्या स्लाइडस् अपडेट करतो. त्याचवेळी व्हॉटसअॅप, इ-मेल तपासतो. काही वस्तू आणायच्या असतील तर बाजारात जातो. तेथेही काही नव्याने शिकण्याचा प्रयत्न करतो. या सर्वांमध्ये सर्वांत आनंददायक काळ म्हणजे नातवाबरोबर खेळण्याचा. दुपारी वामकुक्षी घेतल्यानंतर सायंकाळी दिवसभरातील दुसरा आणि शेवटचा चहा घेतो. त्यानंतर टेबलटेनिस खेळतो आणि काही इंग्रजी मालिका पाहतो. दरम्यान ‘लिंक्डइन’वर काही काळ व्यतीत करतो. यावर आलेल्या कॉमेंटला उत्तर देणे, नवीन काय आले अनुभवणे आदी गोष्टी करतो. मी काही काळासाठीही मोकळा नसतो आणि तू मला फावल्या वेळेत काय करता हे विचारत आहे.’ 

फावला वेळ म्हणजे काय आणि ‘कंटाळलेपणा तुम्ही कसा हाताळता’ हे मला मान्यच नाही. ते सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. आपल्याला करण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. दिवसभरात एवढे करूनही काहीतरी आपण मिस करतो, असे मला वाटत असते.

ता. क. : हा संवाद कोरोनाच्या संसर्गापूर्वीचा आहे. या काळात माझ्यासाठी काही बदलले आहे का? आता मी दररोज बाहेर फिरण्याऐवजी घरातच एक तास चालतो. घरकामात मदत करतो. नाही, माझ्याकडे बोअर होण्यासाठीचा वेळच नाही. खरंतर मला माहितीच नाही, की बोअर कसे व्हायचे असते! तुम्ही बोअर होण्यासाठी तुमच्या आतच काहीतरी घडावे लागते, हो ना?

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article ramesh sud on improve yourself