इम्प्रूव्ह युअरसेल्फ : रहस्य, प्रतिस्पर्ध्याची भीती दूर करण्याचे!

Improve-Yourself
Improve-Yourself

हा ऑक्टोबर २०१० मधील एक प्रसंग. त्या वेळेस मी नुकतीच नोकरी सोडली होती. आपल्या आयुष्यावर ताबा कसा मिळवावा, यासंदर्भात लोकांशी संवाद साधत होतो. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील एका प्रथितयश आणि ज्येष्ठ रेस्टॉरंट व्यावसायिकाशी मी बोलत होतो. आम्ही एका जाहीर कार्यक्रमात सहभागी झालो होतो. मला अजूनही आठवते, मी त्यांना विचारले होते की, तुम्हाला तुमच्या स्पर्धकांची कधी भीती वाटली होती का? माझ्या या प्रश्नाने त्यांना अनपेक्षितपणे कोंडीत पकडले. माझ्या प्रश्नावर त्यांनी विचार करून उत्तर दिले. ते मला अजून आठवते. त्यांच्या या उत्तरामधील संदेश महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्हाला हे उत्तर सांगायला हवे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ते म्हणाले, ‘‘होय‌, मला नेहमीच माझ्या स्पर्धकांची भीती वाटली. तिने मला असुरक्षित बनविले. त्यामुळे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मी भरपूर ऊर्जा आणि एकाग्रता आवश्यक असणाऱ्या गोष्टी केल्या. आता मला कोणत्याही स्पर्धकाची पूर्वीसारखी भीती वाटत नाही.’’

‘ओह, तुम्ही हे बदलले. पण, नेमकी कोणत्या गोष्टीमुळे या बदलाला प्रेरणा मिळाली?’’ मी आश्चर्यचकित होऊन विचारले.

ते म्हणाले, ‘‘तुम्हाला ते सांगण्यात मला आनंदच होईल. एकदा एका वृद्ध व्यक्तीने मला सांगितले की, आपल्याला एखाद्या व्यक्तीची भीती वाटते किंवा तिच्याबद्दल मत्सर वाटतो, तेव्हा त्या व्यक्तीचे श्रेष्ठत्व आपण मान्य केलेले असते.’’ एवढे बोलून त्यांनी क्षणभर विराम घेतला. त्यानंतर एकदम उद्गारले, ‘‘हे ईश्वरा, हे किती सत्य आहे!’’

त्यानंतर पुढे म्हणाले, ‘‘त्यामुळेच प्रतिस्पर्ध्याशी स्पर्धा करण्यापेक्षा त्यांच्याकडून शिकणे अधिक चांगले असते.’’ आता त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचे तेज झळकत होते. मी या प्रसंगातून मिळालेला धडा कधीही विसरू शकत नाही. 
तुम्हीही प्रतिस्पर्ध्याकडून शिकताय ना?

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com