इम्प्रूव्ह युअरसेल्फ : टीकेचा सामना करताना...

रमेश सूद
Thursday, 5 November 2020

एके दिवशीची गोष्ट. एका ज्येष्ठ व्यावसायिकाशी टीका कशी हाताळावी, यावर मी बोलत होतो. आमच्या संभाषणाची गाडी काहीशी अशी बदलली. आयुष्यातील असंख्य चुकांतून मी शिकलेलो असल्यामुळे माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना आहेत.

Entertainment एके दिवशीची गोष्ट. एका ज्येष्ठ व्यावसायिकाशी टीका कशी हाताळावी, यावर मी बोलत होतो. आमच्या संभाषणाची गाडी काहीशी अशी बदलली. आयुष्यातील असंख्य चुकांतून मी शिकलेलो असल्यामुळे माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ते म्हणाले, ‘‘आपण टीका चांगल्या प्रकारे हाताळायला हवी.’’
मी विचारले, ‘‘पण टीका म्हणजे नेमकं काय?’’
‘कुणीतरी तुम्ही बोलत आहात, त्याविरुद्ध बोलणे,’’ त्यांनी उत्तर दिले.
‘म्हणजे विषयाचा एखादा वेगळा मुद्दा मांडणे,’’ मी म्हटले.
माझ्या बोलण्यावर विचार करून ते म्हणाले, ‘‘नाही, मी अशा परिस्थितीबद्दल बोलतोय, जिथे कुणाकडून तरी तुमच्या बोलण्यातील दोष दाखविले जातात.’’
‘हे कशावर आधारित असते?’’ मी पुन्हा प्रश्न केला.
‘कशावरही,’’ ते म्हणाले.

त्यावर मी माझे स्पष्टीकरण दिले, ‘‘हे कशावर तरी आधारित असते. मग ते ज्ञान असेल, अहंकार असेल किंवा अगदी तुमच्याविरुद्धची नापसंती असेल. अगदी वरचढ ठरण्यासाठीही आपला मुद्दा रेटला जाऊ शकतो.’’ 
‘होय, असे असू शकते. मग तुम्ही ते कसे हाताळता?’’ त्यांचा प्रश्न.
‘ते ज्ञानावर आधारित असल्यास त्याला वेगवेगळे पैलू असू शकतात. ते वापरातही आणता येतील. मात्र, ते अहंकार किंवा नापसंतीमुळे होत असल्यास त्याला अज्ञान कारणीभूत असू शकते. त्याचप्रमाणे चुकीच्या मनोवृत्तीमुळेही हे होऊ शकते,’’ मी सविस्तर उत्तर दिले. 

आता त्यांनी विचार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर विचारले, ‘‘तुम्ही बरोबर आहात. पण, हे चुकीच्या मनोवृत्तीतून येते तेव्हा तुम्ही काय करता?’’ 
‘अशावेळी आपल्याला त्या व्यक्तीबद्दल दया वाटायला हवी. त्यामुळे तिने बोललेल्या शब्दांकडेही दुर्लक्ष करावे. मात्र, उद्धटपणातून माझ्यापेक्षा वरचढ होण्यासाठी तुम्ही तसे करत असाल, तर तुम्ही हे सुरू ठेवू शकता. मला तुमच्यावर मात करण्यात रस नाही. त्याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे मी वाद घालणार नाही,’’  मी माझी भूमिका मांडली.

‘गोष्टी अशा सहजसोप्या कशा झाल्या?’’ त्यांनी मला पुन्हा एकदा विचारले.
‘कारण, एकेकाळी मीही त्या गोष्टी कठीण केल्या होत्या. मलाही खूप त्रास झाला. मात्र, या त्रासानेच मला अनुभव आणि धडा दिला. आपण त्रासातून काहीच शिकलो नाही, तर काय अर्थ?’’ मी म्हणालो.
माझ्या बोलण्याबाबत मी खूप स्पष्ट होतो. तुमचे विचार कसे आहेत?

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article ramesh sud on improve yourself

Tags
टॉपिकस
Topic Tags: