वाटा करिअरच्या : अध्यापनातल्या संधी

प्रा. संजीव सोनवणे
Thursday, 9 January 2020

मुख्यत्वे करून चार प्रकारचे एकात्मिक अध्यापक शिक्षण अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यात आले आहेत. बी.एस्सी. बी.एड., बीए बीएड, बीएलएड, बीपीएड हे सर्व अभ्यासक्रम चार वर्षांचे असून, बारावीनंतर प्रवेश दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, या अभ्यासक्रमांची सोय कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये नव्याने स्थापन होणाऱ्या शिक्षणशास्त्र विभागामध्ये होणार आहे.

भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाने नव्या शैक्षणिक धोरणाचे अंतिम स्वरूप नुकतेच जाहीर केले आहे. शिक्षक अध्यापनामध्ये प्रथमच बदल प्रस्तावित केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुख्यत्वे करून चार प्रकारचे एकात्मिक अध्यापक शिक्षण अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यात आले आहेत. बी.एस्सी. बी.एड., बीए बीएड, बीएलएड, बीपीएड हे सर्व अभ्यासक्रम चार वर्षांचे असून, बारावीनंतर प्रवेश दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, या अभ्यासक्रमांची सोय कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये नव्याने स्थापन होणाऱ्या शिक्षणशास्त्र विभागामध्ये होणार आहे. या अभ्यासक्रमांची वैशिष्ट्ये म्हणजे नियमित पदवीच्या विषयांचा अभ्यास करताना अध्यापन शास्त्राचा, मुलांच्या मानसशास्त्राचा, शालेय वर्ग व शाळा व्यवस्थापनाचा, विविध मूल्यमापन पद्धतीचे तंत्रज्ञान शिकविले जाणार आहे. प्रत्येक वर्षी शाळांमध्ये काही काळ काम करावे लागेल. या काळात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्यापनाचा अनुभव दिला जाणार आहे. मार्गदर्शन, निरीक्षण करून अध्यापन कौशल्याचा विकास केला जाईल. 

आता बीए, बीएस्सी तीन वर्षे व पुन्हा बीएड दोन वर्षे अशी पाच वर्षे शिक्षक होण्यासाठी लागतात. एकात्मिक अभ्यासक्रम चार वर्षांचा असल्याने एक वर्ष कमी लागते. ज्यांना मुलांमध्ये, बालकांमध्ये काम करण्यास आवडते त्यांना बीए अथवा बीएस्सी होता होता आता कला व विज्ञान महाविद्यालयातच ही सोय २०२०-२१पासून उपलब्ध होणार आहे. अधिक माहितीसाठी www.ncte.gov.in ला भेट द्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article sanjiv sonawane