इंग्रजी शिका : I KNOW THEm ALL

शैलेश बर्गे
Thursday, 30 April 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आपण सारे घरच्या सदस्यांबरोबर एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी एकत्र राहात आहोत. त्यामुळे आपल्याला एकमेकांच्या बऱ्‍याच बारीकसारीक गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. आपण सारेजण या वेळेचा सदुपयोग करत आहोतच. या लेखांमधून आपण इंग्लिश भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आपण सारे घरच्या सदस्यांबरोबर एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी एकत्र राहात आहोत. त्यामुळे आपल्याला एकमेकांच्या बऱ्‍याच बारीकसारीक गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. आपण सारेजण या वेळेचा सदुपयोग करत आहोतच. या लेखांमधून आपण इंग्लिश भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. विविध कृतींच्या माध्यमातून इंग्लिश भाषेचे एक-एक  घटक आपण नकळतपणे अभ्यासत आहोत, हे तुमच्या लक्षात आले असलेच.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपण आज आणखी एक मजेशीर कृती करणार आहोत. 
ती करण्याआधी खालील आकृती काळजीपूर्वक अभ्यासा व त्यात लाल रंगात दिलेल्या शब्दांच्या आधारे प्रत्येक वाक्याचा अर्थ आधी समजून घ्या. मग आजची कृती करा. ज्या शब्दाला जेवढी जागा जास्त, तेवढे त्याचे प्रमाण जास्त. उदा. खालून पहिल्या पायरीला जास्त जागा व्यापली आहे, म्हणजे ती कृती जास्त प्रमाणात केली जाते. लाल रंगात दाखवलेल्या शब्दांच्या आधारे इतर गोष्टीच्या तुलनेत आपण ही क्रिया किती प्रमाणात करतो ते दाखवता येते. अर्थ व्यवस्थित समजण्यासाठी वाक्यांच्या शेवटी शेकडा प्रमाणही दाखविले आहे. लॉकडाउनच्या काळात आपल्या घरातील सदस्य कोणत्या कृती करतात आणि त्याचे प्रमाण किती आहे हे तुम्हाला समजलेले आहे.

त्या कृती तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायच्या आहेत, पण अगदी प्रामाणिकपणे बरं! यातून दोन गोष्टी साध्य होतील. एक, जे सदस्य चांगली कामे करत आहेत त्याची दखल घेतली गेल्याचा आनंद त्यांना मिळेल आणि दोन, घरातील काही सदस्यांकडून नकळत कामाकडे दुर्लक्ष होत असेल, तर त्यांना ही त्यांच्या कामाची जाणीव होईल. एकमेकांना मदत होऊन सर्वांचीच कामे हलकी होतील. खाली दिलेल्या कोष्टकामध्ये सदस्यांची नावे व कृती दिलेल्या आहेत. वाक्ये तयार करताना वर दिलेल्या आकृतीतील लाल रंगातील शब्द वापरायला विसरू नका. 

दिलेले उदाहरण अभ्यासा आणि जास्तीत जास्त वाक्ये तयार करा. लिहिलेली वाक्ये एकमेकांना दाखवा. आणि हसतखेळत कृती पूर्ण करा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shailesh barge on English learning

Tags
टॉपिकस
Topic Tags: