संधी नोकरीच्या : अभियंत्यांनो, भारताला महासत्ता बनवूया! 

डॉ. शीतलकुमार रवंदळे
Thursday, 8 October 2020

सध्या अभियांत्रिकीसह करिअरच्या इतर संधींविषयीची इत्थंभूत माहिती घेताना दिसत आहेत. बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या मनात अभियांत्रिकीचा पर्याय निवडताना प्रमुख दोन उद्देश असतात -
1) अभियांत्रिकीच्या एखाद्या क्षेत्रातील पदवी मिळविणे
2) अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर भरपूर पैसा मिळवून देणारी नोकरी करणे

सध्या अभियांत्रिकीसह करिअरच्या इतर संधींविषयीची इत्थंभूत माहिती घेताना दिसत आहेत. बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या मनात अभियांत्रिकीचा पर्याय निवडताना प्रमुख दोन उद्देश असतात -

1) अभियांत्रिकीच्या एखाद्या क्षेत्रातील पदवी मिळविणे
2) अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर भरपूर पैसा मिळवून देणारी नोकरी करणे

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वरील दोघेही उद्देश असण्यात काहीही वावगे नाही किंबहुना हे बेसिक उद्देश असायलाच हवेत. मात्र, याच्याही पलीकडे जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे. त्याव्यतिरिक्त खालील मुद्द्यांचा विचार विद्यार्थांनी करावा...

१) अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन एखाद्या तंत्रज्ञानात उच्च दर्जाचे प्रावीण्य मिळविणे
२) अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर करून उद्योगातील व समाजातील काही समस्यांवर उपाय शोधून सर्वसामान्यांचे जीवन सुकर करणे
३) अभियांत्रिकी तंत्रज्ञान वापरून स्वतःचे उत्पादन विकसित तयार करणे व त्याला बाजारात आणून इतरांना नोकरी उपलब्ध करून देणे
४) अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन संरक्षण, स्पेस टेक्नॉलॉजीसारख्या क्षेत्रात भारत बलशाली बनविणे

प्रवेश घेतानाच  विद्यार्थ्यांनी एखादा उद्देश मनात बाळगला आणि मनापासून त्यावर काम केल्यास उच्चशिक्षित अभियंत्यांची पिढी स्वतःला व आपल्या भारताला सर्वश्रेष्ठ बनविल्याशिवाय राहणार नाही. फक्त परीक्षाकेंद्रित व मार्क्सचा विचार करत विद्यार्थी शिकत राहिल्यास त्यांना अभियांत्रिकीच्या पदव्या व पुस्तकी ज्ञान मिळेलच, मात्र त्यांच्यातून खरेखुरे अपेक्षित अभियंते किती बनतील हा प्रश्न असेल. या प्रवासात विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी लॉंग टर्म व शॉर्ट टर्म असे टार्गेटस् ठेवायला हवेत. स्वतःचा वेळ हा फक्त मार्कासाठी पाठांतरात न घालवता छोटे-मोठे तांत्रिक प्रोजेक्ट्स करण्यात जास्त घालविला, तर नक्कीच ते उद्योगाला, समाजाला व देशाला अपेक्षित असे खरेखुरे अभियंते बनून स्वतःची व राष्ट्राची उन्नती करू शकतील. 

उत्तम अभियंता बनण्यासाठी ७०% पुस्तकी ज्ञान (थेअरी) व ३०% प्रॅक्टिकल ज्ञानाऐवजी ७०% प्रोजेक्टवर केलेल्या कामातून मिळणारे ज्ञान (परंपरागत प्रॅक्टिकल नाही ) व ३०% पुस्तकी ज्ञान (थेअरी) विद्यार्थ्यांनी घेतले पाहिजे.
महाविद्यालयातून बाहेर पडणारे अभियंते सांगतात, ‘‘मी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन ७५% मार्क्स घेऊन उत्तीर्ण झालो.’’ त्याऐवजी नजीकच्या भविष्यात अभियंत्यांनी सांगायला हवे, ‘‘मी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन २५ प्रोजेक्ट्स बनवून उत्तीर्ण झालो.’’ आज आपण जगाचा विचार केला, तर चीनसारखा देश ज्याची एक राष्ट्र म्हणून सुरुवात व अंतर्गत यादवी तसेच बाहेरील आक्रमणांपासून उसंत जवळपास आपल्या भारताबरोबरीनेच झाली.

मात्र, आज अमेरिकेसारख्या जागतिक सुपरपॉवरच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत व भारतासारख्या शांतताप्रिय देशाला तसेच जपान सारख्या शेजारी देशांना आपल्या शक्तीचा ‘माज’ दाखविण्याचा उर्मठपणा चीनमध्ये कुठून आला? ह्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे उत्तर तंत्रज्ञानात किंवा इतरांनी तयार केलेले तंत्रज्ञान वापरणे यात दिसेल.

भारताना सुपरपॉवर बनायचे असल्यास भारतातील अभियंत्यांनी व अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कंबर कसायला हवी. चला तर मग, उत्तम अभियंते बनून आपल्या भारताला महासत्ता बनविण्यात योगदान देऊया.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shitalkumar ravandale on Job Opportunity