संधी नोकरीच्या : नोकरी मिळविण्याची गुरुकिल्ली

शीतलकुमार रवंदळे
Thursday, 7 May 2020

अनेक महाविद्यालयात उत्तम प्रकारे पुस्तकी ज्ञान देण्यात येते. मात्र, उद्योगांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांकडून चांगल्या तांत्रिक ज्ञानाची अपेक्षा असते. ते मिळविण्यासाठीचा उत्तम पर्याय म्हणजे कंपनीत इंटर्नशिप करणे, हा होय. देशातील तांत्रिक शिक्षणावर अंमल असणारी सरकारची यंत्रणा AICTE  तर्फे राबविली जाते. गेल्या काही काळात AICTE ने शैक्षणिक पद्धतीत अनेक सकारात्मक बदल केल्याचे दिसून येते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे इंटर्नशीप धोरण होय.

अनेक महाविद्यालयात उत्तम प्रकारे पुस्तकी ज्ञान देण्यात येते. मात्र, उद्योगांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांकडून चांगल्या तांत्रिक ज्ञानाची अपेक्षा असते. ते मिळविण्यासाठीचा उत्तम पर्याय म्हणजे कंपनीत इंटर्नशिप करणे, हा होय. देशातील तांत्रिक शिक्षणावर अंमल असणारी सरकारची यंत्रणा AICTE  तर्फे राबविली जाते. गेल्या काही काळात AICTE ने शैक्षणिक पद्धतीत अनेक सकारात्मक बदल केल्याचे दिसून येते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे इंटर्नशीप धोरण होय. भारतातील अभियंत्यांना जागतिक पातळीवरील स्पर्धेत टिकण्यासाठी ते संजीवनीच ठरू शकते. शैक्षणिक संस्थांनी या धोरणाची काटेकोरपणे राबविल्यास विद्यार्थी रोजगारक्षम होऊन त्यांना इंटर्नशीप देणाऱ्या कंपन्याच नोकऱ्या देतील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

धोरणाचा उद्देश
१) विद्यार्थ्यांना औद्योगिक वातावरणाचा अनुभव देणे 
२) ज्या गोष्टी वर्गात प्रत्यक्ष दाखवता येऊ शकत नाही, त्या कंपनीत दाखविणे.
३) औद्योगिक क्षेत्रातील ताज्या तांत्रिक घडामोडीची विद्यार्थ्याला माहिती देणे.
४) उद्योगजगतातील प्रत्यक्ष अनुभवावर वर्गात चर्चा घडविणे. 
५) ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष औद्योगिक प्रश्‍न सोडविण्यासाठी करणे.
६) उद्योग जगताला लागणारी कौशल्ये विकसित करणे. 

इंटर्नशिपचे फायदे
अ) विद्यार्थ्यांचे फायदे 

१) संबंधित क्षेत्र आपल्या करिअरसाठी चांगले आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी मदत. 
२) टीम वर्क व संभाषण कौशल्यात वाढ. 
३) आपल्या भावी आयुष्यासाठी उपयुक्त माणसांचे नेटवर्क उभारण्यास मदत. 
४) नोकरीची संधी. 
५) कंपनी व त्यातील कल्चर समजण्याची संधी. 
६) काही कंपन्या प्रति महिना ५,००० रुपयापासून ते ५०,००० रुपयांपर्यंत स्टायपेन्ड देतात.

ब) महाविद्यालयाचे फायदे
१) उद्योगजगतातील संबंध वाढविण्यास मदत. 
२) प्लेसमेंट च्या टक्केवारीत मोठ्या प्रमाणावर वाढ. 
३) महाविद्यालयाचे उद्योगात ब्रॅण्डिंग. 
४) उद्योगाच्या गरजा समजून त्यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची संधी. 
५) मुलांचे महाविद्यालयासाठीचे आकर्षण वाढते व शिक्षणात गोडी निर्माण होते.

क) कंपन्यांचे फायदे 
१) कल्पनाशक्ती असलेल्या तरुणांची शक्ती कमी खर्चात वापरता येते.
२) वर्षभर दोन सत्रांत मनुष्यबळ मिळेल. 
३) उद्योगांची शैक्षणिक क्षेत्रात ब्रॅण्डिंग. 
४) छोटे छोटे अनेक प्रोजेक्ट जे कंपन्या नंतर प्राधान्य देण्याच्या विचारात असतात त्यांना हे तरुण सहज सोडवतील.  

इंटर्नशिपसाठी अंमलबजावणी व तपासणी

  • विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांच्या परवानगीचे पत्र कंपनीत देणे, इंटर्नशिप सुरू केल्याची माहिती महाविद्यालयात देणे. इंटर्नशिप संपल्यानंतर कंपनीकडून सर्टिफिकेट घेउन महाविद्यालयात सादर करणे.
  • महाविद्यालयात व कंपनी या दोघांकडून विद्यार्थ्याचे नियमित निरीक्षण व्हायला हवे व शेवटी विद्यार्थ्याने रिपोर्ट सोबतच प्रेझेंटेशन  द्यायला हवे.

अडचणी
१) खूप जास्त प्रमाणात विद्यार्थी असल्यामुळे इतक्या सर्व विध्यार्थाना सहजपणे इंटर्नशिप मिळणे कठीण जाते.
२) आयटी क्षेत्रात जागेची वानवा असल्यामुळे विध्यार्थाना प्रत्यक्ष इंटर्नशिप ऐवजी ऑनलाइन इंटर्नशिप देता येईल.
३) जोपर्यंत विध्यार्थी इंटर्नशिप करतानाची हजेरी महाविद्यालये व विद्यापीठे गृहीत धरणार नाहीत तोपर्यंत विद्यार्थी गंभीर होणार नाहीत.
४) कंपन्यातील काही लोकांचा वेळ यासाठी द्यावा लागणार. 

उपाय
१)  इंटर्नशीपसाठी लागणाऱ्या वेळेसाठी त्या कोर्सचा ४ वर्षाचा (अभियांत्रिकीसाठी) किंवा ३ वर्षाचा डिप्लोमासाठी कालावधी तेवढाच ठेवून एखाद्या सत्रातील विषय इतर सत्रात समाविष्ट करायला हवेत. 
२.  इंटर्नशीपसाठी इतर विषयांप्रमाणे गुण द्यायला हवेत. 
३.  महाविद्यालयीन वेळेनंतर किंवा शनिवार/रविवार सारख्या सुटीत सलग केलेले इंटर्नशीप गृहीत धरायला हवेत 
४. AICTE यावर अत्यंत प्रभावी अशी एक स्वतंत्र वेबसाइट तयार करण्याच्या प्रयत्नात असून १) विद्यार्थी  २) उद्योग  
३) महाविद्यालय/TPO या तिघांसाठी ते  प्रचंड उपयोगी असेल. 
५) उद्योग व शैक्षणिक संस्था यांचे एकत्रित जाळे उभारल्याने खूप अडचणी सुटतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shitalkumar ravandale on The key to getting a job