जपान आणि संधी : असा असतो राहण्याचा खर्च

सुजाता कोळेकर
Thursday, 16 July 2020

टोकियो हे जगामधील सगळ्यात महागडे शहर म्हणून ओळखले जाते, तर (कॉस्ट ऑफ सर्व्हेप्रमाणे) नोकरीची सर्वाधिक संधीही टोकिओमध्येच असते. मला अनेक जण विचारतात की, टोकियोमध्ये राहण्यासाठी किती खर्च येतो?

टोकियो हे जगामधील सगळ्यात महागडे शहर म्हणून ओळखले जाते, तर (कॉस्ट ऑफ सर्व्हेप्रमाणे) नोकरीची सर्वाधिक संधीही टोकिओमध्येच असते. मला अनेक जण विचारतात की, टोकियोमध्ये राहण्यासाठी किती खर्च येतो? 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टोकिओमधील पगार हा साधारण ३,००,००० जपानी येनपासून सुरू होतो आणि तो अनुभव आणि योग्यतेप्रमाणे वाढत जातो. आपण कमीत कमी पगाराचा विचार करूया. तुम्हाला ३,००,००० जपानी येन पगार मिळत असेल, तर खालील प्रमाणे खर्च येईल. 

  • घराचे भाडे - ५०,०००-६०,०००  - १DK - म्हणजे एक हॉल, डायनिंग एरिया आणि स्वयंपाकघर असे असते. या घरामध्ये सगळ्या सोयी असतात.
  • गव्हर्नमेंट हौसिंगची पण सोय असते. ही अपार्टमेंट्स १DK ,१LDK ,२LDK ,३LDK अशी असतात. घराच्या एरिया व आकाराप्रमाणे भाडे वाढत जातो.
  • प्रायव्हेट  घर घेण्यासाठी ब्रोकरेज, डिपॉझिट, बक्षीस पैसे, असे ५-६ महिन्यांचे भाडे आधी द्यावे लागते. 
  • काही कंपन्या राहण्याची सोय त्यांच्या हॉस्टेलमध्ये किंवा अपार्टमेंट्समध्ये करतात तेव्हा पगार कमी असू शकतो.
  • मोबाइल महिना खर्च - जपानमध्ये सगळ्याच मोबाइल कंपन्या वेगवेगळे प्लॅन्स देतात. हे प्लॅन्स २००० जपानी येनपासून सुरू होतात. 

वरील खर्च लक्षात घेता साधारण महिनाभराचा खर्च ९९,५०० जपानी येन ते १,१९,५०० जपानी येन येईल. म्हणजे साधारण १८,०५०० जपानी येन ते २०,०५०० जपानी येन शिल्लक राहतील. आपण सगळ्यात कमी पगाराचा विचार केला आहे. १०० येन म्हणजे साधारण ७० भारतीय रुपये, असे सध्या मूल्य आहे. म्हणजे कमीत कमी  १,२५,००० रुपये वाचू शकतील.बऱ्याच कंपन्या ओव्हरटाईमचा भत्ता पण देतात. ही ज्यादा कमाई आहे. 

  • जपानमध्ये १०० येनची दुकाने असतात, त्यामध्ये घरासाठी लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी मिळतात. नुकतेच जपानमध्ये गेलेल्या व्यक्तीसाठी हे एक वरदान आहे. 
  • जपानमध्ये फुल्ली फर्निश अपार्टमेंटही खूप असतात, त्यामध्ये इंटरनेट, फोन अशा सोयी असतात. परंतु महिना भाडे जास्त असते.
  • आपण टोकिओमधील खर्च पाहिला, ओसाका, कोबे, हिरोशिमा, नागोया अशा शहरांमध्ये खर्च कमी येऊ शकतो.

वरील खर्च हा एक मार्गदर्शक आलेख समजावा. काही ठिकाणी खर्च कमी जास्त होऊ शकतो. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article sujata kelkar on japan and chance