जपान आणि संधी : वैशिष्ट्ये जपानमधील शिक्षणव्यवस्थ्येची

सुजाता कोळेकर
Thursday, 6 August 2020

माझी मुलगी १ वर्षाची असताना पाळणाघरात जात होती. सहकारी शिक्षक तिच्याबद्दलची सर्व माहिती संध्याकाळी देत असत. किती सूप प्यायली, काय व किती जेवली, किती वेळ झोपली आणि काय काय केले अशा सगळ्या गोष्टी सविस्तर प्रत्येक पालकांना रोज त्या शिक्षिका सांगत असत. इतकेच नाही, तर माझी मुलगी कपड्यांच्या घड्या घालणे, स्वतःचे कपडे स्वतः कपाटात नीट ठेवणे, स्वतः कपडे घालणे, अंघोळ करणे, व्हॅक्युम क्लिनरने घर साफ करणे या गोष्टी  शिकली होती. ती पोहायलाही शिकली होती.

जपानमध्ये एकच शैक्षणिक बोर्ड आहे.  MEXT (The Ministry of Education, Culture, Sports, Science and Technology). तेथील शिक्षणपद्धती कशी आहे पाहूया

१. पाळणाघर - वय वर्षे १ ते पाचपर्यंत. 
यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, मोठ्या लोकांशी कसे बोलावे, जपानी संस्कृती,  शिष्टाचार, शाळा स्वच्छ कशी करावी, शाळेच्या स्वयंपाक घरात मदत कशी करावी असे धडे दिले जातात. मुले वेगवेगळे गट करून कामे करतात. त्यांना अगदी लहानपणापासूनच कामाची सवय लागते.  

माझी मुलगी १ वर्षाची असताना पाळणाघरात जात होती. सहकारी शिक्षक तिच्याबद्दलची सर्व माहिती संध्याकाळी देत असत. किती सूप प्यायली, काय व किती जेवली, किती वेळ झोपली आणि काय काय केले अशा सगळ्या गोष्टी सविस्तर प्रत्येक पालकांना रोज त्या शिक्षिका सांगत असत. इतकेच नाही, तर माझी मुलगी कपड्यांच्या घड्या घालणे, स्वतःचे कपडे स्वतः कपाटात नीट ठेवणे, स्वतः कपडे घालणे, अंघोळ करणे, व्हॅक्युम क्लिनरने घर साफ करणे या गोष्टी  शिकली होती. ती पोहायलाही शिकली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

२. प्राथमिक शिक्षण - वय वर्षे सहापासून बारापर्यंत.
यामध्ये शारीरिक आणि मानसिक विकासावर भर दिला जातो. विद्यार्थ्याला आवड असलेल्या गोष्टींची कामेच त्याला दिली जातात किंवा तशी प्रत्यक्ष चालणारी कामेही विद्यार्थी करतात. 

३. माध्यमिक शिक्षण - वय वर्षे १२पासून १५पर्यंत. 
प्राथमिक शाळेच्या शिक्षणावर पुढचे शिक्षण यामध्ये दिले जाते. प्रायोगिक शिक्षण जास्त दिले जाते. पहिली ते नववीपर्यंतचे शिक्षण सगळ्यांसाठी अनिवार्य आहे. 

४. उच्च माध्यमिक शाळा - पहिली ते नववीचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी उच्च माध्यमिक शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकतात. 
हे शिक्षण ३ वर्षे पूर्ण वेळ असते. जपानमध्ये अनेक अर्धवेळ शैक्षणिक वर्गही चालतात. उच्च माध्यमिक वर्ग साधारण ३ विभागात विभागले जातात. 

सामान्य, विशेष आणि संकलित अभ्यासक्रम. 

  • सामान्य अभ्यासक्रम प्रामुख्याने सामान्य शिक्षण प्रदान करतात. उच्च शिक्षण घेण्यासाठी इच्छुक आणि नोकरी मिळणार आहे, मात्र कोणत्याही व्यावसायिक क्षेत्राची निवड केलेली नसलेल्यांसाठी हे शिक्षण असते.
  •  विशेष अभ्यासक्रम मुख्यतः ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे भविष्यातील करिअर म्हणून एखाद्या विशिष्ट व्यावसायिक क्षेत्राची निवड केली असलेल्यांना व्यावसायिक किंवा इतर विशेष शिक्षण प्रदान करण्यासाठी असतो. या अभ्यासक्रमांचे पुढील वर्गीकरण केले जाऊ शकते - शेती, उद्योग, वाणिज्य, मत्स्यपालन, गृह अर्थशास्त्र, नर्सिंग, विज्ञान-गणित, शारीरिक शिक्षण, संगीत, कला, इंग्रजी भाषा आणि इतर अभ्यासक्रम.
  • संकलित अभ्यासक्रम १९८४पासून सुरू झाले आहेत. या अभ्यासक्रमांमध्ये सर्वसाधारण आणि विशेष अभ्यासक्रम या दोन्हींमधील विविध विषय उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांची रुची, क्षमता आणि योग्यता, भविष्यातील करिअर योजना इत्यादी पुरेसे करण्यासाठी हा अभ्यासक्रम असतो.

५. महाविद्यालयीन शिक्षण 
जपानमधील उच्चशिक्षण संस्थांमध्ये विद्यापीठे, कनिष्ठ महाविद्यालये आणि तंत्रज्ञानाची महाविद्यालये समाविष्ट आहेत. यामध्ये तंत्र महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, वेगवेगळी कला विद्यालये असे विविध प्रकार आहेत. येथे अनेक विषय न शिकता एकाद्याच विषयाचे अनेक पैलू शिकून त्यात विशेषज्ञता मिळवता येते. सगळ्याच शिक्षणामध्ये प्रात्यक्षिक शिक्षणावर अधिक भर असतो. 
६. उच्चशिक्षण/ पीएचडी 
वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा देऊन या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवता येतो. बरीच विद्यालये जपानबाहेरील विद्यार्थ्यांनाही प्रवेश देतात. त्याचा फायदा भारतीय विद्यार्थ्यांनीही घ्यायला हवा. हा प्रवेश मिळवण्यासाठी जपानी भाषा येणे गरजेचे आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article sujata kolekar on Japan and opportunity