Robot
Robot

जपान आणि संधी : जावे रोबोंच्या देशा...!

माझ्या मागच्या वर्षीच्या जपान ट्रिपमध्ये चेक आउट करताना बिलामध्ये बदल हवाय, असे सांगितल्यावर रिसेप्शनला रोबो आहे असे लक्षात आले! नियमित कामे करावी लागतात आणि त्यात काही बदल होत नाही अशा ठिकाणी जपानमध्ये रोबो वापरले जातात. 

जपानमध्ये वयोवृद्ध लोक खूप आहेत. अशा लोकांसाठी रोबो कुत्रे तयार केले आहेत. ते ठरावीक मर्यादेपर्यंत त्यांच्याशी संवाद साधू शकतात. अगदी खऱ्या पाळीव प्राण्याप्रमाणे हे रोबो वागतात त्यामुळे या लोकांचे जीवन सुखकर होते. 

जपानमधील रोबो -
Humanoid robots

होंडा कंपनीने २०००मध्ये ASIMO नावाचा रोबो तयार केला आणि तो लोकांची वेगवेगळी मदत करतो. हा रोबो नृत्य करतो, पळू शकतो, सॉकर खेळू शकतो. हा रोबो जाहिरातीसाठीही वापरला जातो. या प्रकारचे अनेक रोबो जपानने विकसित केले आहेत. 

Animal (four-legged) robots 
सोनी जपानने हा रोबो तयार केला आहे. हा रोबो पाळीव कुत्रा असतो, अगदी तसाच असतो. घरातील वयोवृद्ध लोक किंवा लहान मुलांशी खेळतो. एकटेपणा दूर करण्यासाठी याचा वापर प्रामुख्याने केला जातो. 

Androids 
हे रोबोट्स अगदी माणसासारखे असतात आणि प्रशिक्षण देणे, प्रदर्शनामध्ये माहिती सांगणे या प्रकारची कामे करतात. हे रोबो एखाद्या सुंदर जपानी मुलींसारखे दिसतात. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Guard robots
वेगवेगळ्या प्रकारचे चौकीदार हे या रोबोमध्ये येतात. सोहोगो आणि सा न्यो कंपन्या प्रामुख्याने हे रोबो बनवतात. 

Social robots
लहान मुलांबरोबर खेळणे, त्यांना अंघोळ घालून तयार करणे अशा प्रकारची कामे हे रोबो करतात. वेगवेगळ्या मानसिक उपचारांसाठीही हे रोबो वापरले जातात. 

Mobility robots
वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी या प्रकारचे रोबो वापरले जातात. प्रामुख्याने कंपन्यांमध्ये यांचा उपयोग होतो. कोरोनाच्या काळात खाद्यपदार्थ नेऊन देण्यासाठी हॉटेल्समध्ये यांचा वापर सुरू केला आहे. 

Domestic robots 
घरातील कामे करण्यासाठी यांचा उपयोग होतो. माझी जपानी मैत्रीण ऑफिसला येताना अशा प्रकारचा रोबो घरी सुरू करून यायची आणि तो सगळे घर स्वच्छ करत होता. हेच रोबो हॉटेल्समध्ये ऑर्डर घेणे, कुकिंग, सर्व्हिंग करणे यासाठीही वापरले जातात. 

Rescue robots
जपानमध्ये भूकंप, सुनामी, टायफून होत असतात. त्यामध्ये अडकलेल्या लोकांना शोधणे किंवा वाचवणे अशा कामांसाठी हे रोबो वापरले जातात. 

Astronaut robots
जपान २०१३ पासून या प्रकारचे रोबो वापरत आहे. हे रोबो संशोधनासाठी वापरले जातात. 

Industrial robotics
जपानच्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या कामांसाठी हे रोबो खूप ठिकाणी वापरले जातात. काही कामे पूर्णपणे रोबो करतात. 

Medical Field Robots 
ऑपरेशन करणे, ऑपरेशनची पूर्व तयारी करणे, नर्सिंगची मदत करणे, रुग्णाला ठरावीक प्रश्‍न विचारून उत्तरे रेकॉर्ड करणे अशा बऱ्याच कामांसाठी हे रोबो वापरले जातात.  

जगातील ५२ टक्के रोबो जपानमध्ये तयार होतात. जपान जगभरात त्यांचा पुरवठा करतो. अजूनही अनेक क्षेत्रांमध्ये जपानमध्ये रोबो वापरले जातात. रोबोटिक्समध्ये करिअर करायचे असेल त्यांच्यासाठी जपान हा चांगला पर्याय आहे. त्यासाठी जपानी भाषा येणे खूप गरजेचे आहे. रोबोटिक्सची आवड असलेल्यानी जपानी भाषा शिकायला लगेचच सुरुवात केली पाहिजे, हे नक्की.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com