परदेशात शिका : वर्क व्हिसा म्हणजे काय?

विलास सावरगावकर, अमेरिका
Thursday, 9 April 2020

नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? कृपया बाहेर पडू नका, आम्हीही अमेरिकत आमच्या घरीच आहोत व घरूनच काम करत आहोत, आपण सर्वजण काळजी घ्या, आपण या सर्वातून नक्कीच बाहेर येऊ अशी खात्री आहे. चला, आज आपण माहिती घेऊ ते H1B व L1या दोन वर्क व्हिसांची.

नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? कृपया बाहेर पडू नका, आम्हीही अमेरिकत आमच्या घरीच आहोत व घरूनच काम करत आहोत, आपण सर्वजण काळजी घ्या, आपण या सर्वातून नक्कीच बाहेर येऊ अशी खात्री आहे. चला, आज आपण माहिती घेऊ ते H1B व L1या दोन वर्क व्हिसांची.

H 1B हा आपणा सर्वांच्या परिचयाचा आहे किंवा असावा. H1B हा तुमची एका विषयातील विशेष प्रावीण्य असल्याने आपणांस नोकरी मिळते. त्याला Speciality occupation visa असे म्हणतात. आपण अमेरिकेत मास्टर्स पूर्ण केले असल्यास तो लगेच मिळायला मदत होते. पहिल्यांदा तीन वर्षांसाठी हा व्हिसा मिळतो. तो ऑक्टोबरपासून सुरू होतो, कारण अमेरिकन व्हिसाचे नवीन वर्ष ऑक्टोबरपासून सुरू होते. यानंतर आपणास अजून तीन वर्षे वाढवून मिळतो. एकंदर सहा वर्षांसाठी तो मिळतो. अजून काही गोष्टी केल्यास त्याची मुदत अजून वाढवून मिळते. त्याबद्दल मी नंतर विस्ताराने लिहीन.

आता L1 व्हिसा हा intracompany ट्रान्सफर म्हणून मिळतो. आपल्या कंपनीची भारत व अमेरिकेत यासाठी नोंदणी असणे जरुरी असते.

हा व्हिसा दोन प्रकारचा असतो, एक रेग्युलर टेक्निकल पर्सनसाठी असतो. यासाठी व्हिसासाठीची मुलाखत खूप कठीण असते. दुसरा प्रकार आहे L1A व्हिसा याला इंटर कंपनी मॅनेजर असे म्हणतात. या व्हिसासाठी आपणास भारतात मॅनेजरचा रोल असणे महत्त्वाचा आहे. या व्हिसासाठीची मुलाखतही फार कठीण असते. हा व्हिसाही तीन वर्षासाठीच मिळतो. त्याचा एकंदर कार्यकाल सात वर्षे असतो. 

H1B व्हिसा व L1 व्हिसामध्ये मुख्य फरक असा आहे, की H1B मध्ये आपल्यावरील अवलंबित्वाला म्हणजे आपल्या नवरा व बायकोला काम करता येणार नाही.

आपल्याकडे L1 व्हिसा असल्यास आपल्या बायको, मुले, व नवरा यांना काम करता येते.

आपण योग्य पावले उचलली व आपल्या कंपनीने मदत केल्यास L1 व्हिसामुळे आपले ग्रीन कार्ड लवकर होऊ शकते. बहुतेक कंपन्यांना ही मदत करतात, कारण त्यात त्याचाही फायदा असतो. भारतात आज अनेक विदेशी कंपनीची ऑफिसेस आहेत, त्यात युरोपियन कंपनीही आहेत व या कंपन्यांचीही अमेरिकेत ब्रँच ऑफिसेस आहेत, आपण त्याचा उपयोग करून घ्या. आपण पुढील लेखात ग्रीन कार्ड प्रोसेसची माहिती घेऊ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article vilas savargavkar on What is a work visa