विशेष : इंग्रजी शिकायचे म्हणजे काय? | learn English | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Learn English
विशेष : इंग्रजी शिकायचे म्हणजे काय?

विशेष : इंग्रजी शिकायचे म्हणजे काय?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इंग्रजीचे स्थान आपल्या जीवनात महत्त्वाचे आहे. अनेक वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन अपेक्षांचा विचार त्याच बरोबरीने इतर अनेक कारणांनी आपण इंग्रजी शिकायला प्राधान्य देत असतो. तुम्ही तर इयत्ता पहिली पासून इंग्रजी शिकत आला आहात. त्यामुळे इंग्रजीवर प्रभुत्व मिळवायला तुम्ही नक्कीच सुरुवात केलेली असणार. इंग्रजी शिकणार आहात म्हणजे नक्की काय करणार आहात? जे आपल्याला शिकायचं आहे ते का? त्यामागचे कारण जाणून घेणे महत्त्वाचे. यासाठी पुढील प्रश्नांबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे बरं.

१. मला इंगजीतून स्वतःचा विचार करता येतो का?

२. स्वतःचा विचार इंग्रजीमधून व्यक्त करता येतो का?

३. इंग्रजीतील एखादी गोष्ट माझी मला वाचून इतरांच्या मदती शिवाय समजून घेता येते का?

४. इंग्रजीतून मला माहितीचे आदान प्रदान करता येते का?

५. मी शब्दांचे अर्थ संदर्भावरून स्वतःच जाणून घेऊ शकतो का?

६. इंग्रजीतून काही कल्पनारम्य, सर्जनशील असे लेखन मला करता येते का?

७. इंग्रजी काव्यातील आनंद मला घेता येतो का?

८. इंग्रजीमधून मांडलेल्या माहितीचे विश्लेषण करून काही निष्कर्ष काढू शकतो का?

९. इंग्रजीतून तोंडी किंवा लेखी वर्णन करू शकतो का?

१०. विविध माध्यमात मांडलेली माहिती इंग्रजीमध्ये रुपांतरीत करू शकतो का?

११. माझ्या इंग्रजीच्या वापरात जास्तीत जास्त अचूकता कशी आणता येईल?

या आणि यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे होकारार्थी येण्यासाठी सर्व कौशल्ये तुम्हाला आत्मसात करावी लागणार आहात.

loading image
go to top