भविष्य नोकऱ्यांचे : पूरस्थितीची ‘स्मार्ट’ पूर्वसूचना

डॉ. आशिष तेंडुलकर
Thursday, 31 December 2020

आपल्या ‘एआय’ लेखमालेतील या वर्षातील हा शेवटचा लेख! या लेखात आपण पूरस्थितीची पूर्वसूचना देण्यासाठी केलेल्या ‘एआय’च्या अनुप्रयोगाबद्दल माहिती घेणार आहोत.

आपल्या ‘एआय’ लेखमालेतील या वर्षातील हा शेवटचा लेख! या लेखात आपण पूरस्थितीची पूर्वसूचना देण्यासाठी केलेल्या ‘एआय’च्या अनुप्रयोगाबद्दल माहिती घेणार आहोत.

अतिवृष्टीमुळे किंवा पावसाळी ऋतूत येणारे पूर हे अनेकवेळा हानिकारक असतात! काही वेळेला याबाबत पूर्वसूचना मिळते आणि होणारी जीवित आणि वित्तहानी निदान काही प्रमाणात तरी टाळता येते. मात्र, पूर्वसूचनेशिवाय येणारे पूर अनेक संसार उद्ध्वस्त करून जातात आणि अपार वित्तहानीही करतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अशा प्रकारे होणारी जीवित आणि वित्त हानी टाळता येईल का, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे! माहितीच्या एकत्रीकरणाशिवाय या संपूर्ण वर्षभर आपण सर्वांनी वाचलेल्या एआय तंत्रज्ञानाचा यामध्ये काही उपयोग करता येईल, का असे प्रश्न आपणास पडले असल्यास नवल नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या अनुप्रयोगामध्ये ‘एआय’चा वापर थोड्या वेगळ्या अंगाने केला गेला आहे. यासाठी नदीच्या पात्रातील पाण्याची सद्यःस्थिती, पात्राची रचना, भौगोलिक स्थिती, पाणलोट क्षेत्रात पडलेला पाऊस या गोष्टींचा वापर करून नदीच्या पाण्याच्या फुगवट्याचा अंदाज बांधला जातो. यामध्ये भौतिक शास्त्रीय आणि हायड्रोलॉजी प्रारूपांचा वापर केला जातो. उपलब्ध माहितीवरून हे प्रारूप पूरस्थिती निर्माण होऊ शकणाऱ्या जागांचा अचूक अंदाज वर्तविला जातो. या अंदाजावरून संबंधित क्षेत्रातील शासकीय यंत्रणा आणि सर्वसामान्य नागरिकांना त्या विषयीच्या सूचना दिल्या जातात. या प्रारूपावरून उत्पन्न होऊ घातलेल्या पूरस्थितीची सूचना गुगल अलर्ट मधून दिली जाते. 

या प्रारूपाविषयी विशेष नोंद घ्यायची गोष्ट अशी की, यामध्ये वर्षोनुवर्षे वापरल्या जाण्याऱ्या हायड्रोलॉजी प्रारूपांचा वापर केला गेला आहे आणि त्याला इतर माहितीची जोड देऊन अचूक सखोल मज्जासदृश्य प्रारूप तयार करण्यात आले आहे. ही गोष्ट नव्या एआय प्रयोगामध्ये कार्यक्षेत्र तज्ज्ञ आणि त्यांनी केलेल्या अथक संशोधनाची आवश्यकता आणि अपरिहार्यता अधोरेखित करते. 

अशा प्रकारे बनविलेली प्रारूपे अधिक स्वीकारार्ह  असतात आणि त्यामधून कार्यक्षेत्र तज्ज्ञ आणि एआय तज्ज्ञांना संयुक्तपणे काम करण्याची संधी मिळते. यामधून विविध नवीन संकल्पनांना चालना मिळून त्या त्या क्षेत्रामध्ये प्रगतीची नवीन दालने खुली होण्यास मदत होते. 

सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Dr Ashish Tendulkar Job Future