संधी नोकरीच्या : एचआर आणि फ्रेशर्सकडून अपेक्षा...

Job-Opportunity
Job-Opportunity

विविध क्षेत्रांतील कंपन्यांमधील एचआरच्या फ्रेशर्सकडून काय अपेक्षा असतात, कंपनीत भरती झाल्यानंतर फ्रेशर्सना कोणते ट्रेनिंग दिले जाते, कोणते सर्टिफिकेशन कोर्स केल्यास प्राधान्य दिले जाते, यांसारख्या प्रश्नांची उत्तरे आपण याच क्षेत्रात काम केलेल्या प्रेम आपटे यांच्याकडून जाणून घेऊयात.

प्रेम आपटे झेन्सार टेक्नॉलॉजी या कंपनीतून व्हाइस प्रेसिडेंट या पदावरून निवृत्त झाले आहेत. आयटी क्षेत्रातील सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, नोकरभरती व ट्रेनिंग क्षेत्रातील त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. आयआयटी मुंबई येथून त्यांनी संगणकशास्त्रात ‘एम. टेक’ची पदवी घेतली. त्यानंतर ३५ वर्षे आयटी क्षेत्रात काम केले. सुरवातीची अनेक वर्षे त्यांनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये तांत्रिक बाबींवर काम केले. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मराठे इंजिनिअरिंग इंडस्ट्रिज (मिरज), इंटरनॅशनल कॉम्प्युटर्स इंडिया (पुणे), डिजिटल इनोव्हेशन लिमिटेड (बडोदा), झेन्सार टेक्नॉलॉजी (पुणे), सॉफ्टवेअर मुगल (नोएडा) यांसारख्या कंपन्यांतील कामाचा अनुभव त्यांना आहे.

प्रेम आपटे यांच्या मतानुसार, आजकालच्या फ्रेशर्सपैकी सुमारे १० ते १५ % विद्यार्थी स्वयंप्ररित असतात व ते स्वतःच पुढाकार घेऊन कामात मग्न होतात. ४० ते ५० % विद्यार्थी कंपनीतर्फे ट्रेन करून उपयोगात आणण्याजोगे असतात. २५ ते ३० % विद्यार्थी ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर एखादा क्लास केल्यानंतर कंपनीत जॉईन होण्यासाठी तयार होतात. १० ते १५ % विध्यार्थी इतर करिअरची निवड करतात. Differential Hiring मार्फत ज्यांना जास्त पगाराची अपेक्षा असते अशा विद्यार्थ्यांनी प्रोग्रामिंगमध्ये उच्च दर्जाचे प्रावीण्य मिळवायला हवे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयटीच्या फ्रेशर्सकडून अपेक्षा

  • एकट्याने काम करण्याची क्षमता 
  • प्रोग्रामिंगचे उत्तम कौशल्य 
  • चांगल्या प्रतीचे संवाद कौशल्य 
  • पॉझिटिव्ह ॲटिट्यूड 

विद्यार्थ्यांनी काय करायला हवे?

  • इंग्रजी संभाषण कौशल्यात निपुण बनणे. 
  • ॲप्टीट्यूड कौशल्य वाढविणे. 
  • कॅम्पस प्लेसमेंटसाठी येणाऱ्या कंपन्यांबद्दल आधीच माहिती मिळवणे.
  • अभ्यासाबरोबर इतर सामाजिक कार्ये वा महाविद्यालयातील विविध उपक्रमात सहभागी होणे.

आयटी कंपनीत मिळणारे ट्रेनिंग 

  • आयटी कंपन्यात प्रामुख्याने जावा, डेटाबेस, वेब टेकनॉलॉजिज, सोशल नेटवर्किंग, मोबाइल कॉम्पुटिंग इत्यादी तंत्रज्ञानावर ट्रेनिंग दिले जाते. गरजेनुसार त्यामध्ये कंपनीनिहाय भिन्नता असते.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे सर्टिफिकेशन्स

  • विद्यार्थ्यांनी जावा, ओरॅकल, मायक्रोसॉफ्ट, अँड्रॉइड इत्यादी मध्ये सर्टिफिकेशन घ्यावे.

विद्यार्थ्यांना भविष्यात फायद्याचे ठरणारे तंत्रज्ञान 

  • भविष्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना बिग डेटा, बिझनेस इंटेलिजन्स, मोबिलिटी, डेटा सायन्स, मशिन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारखे तंत्रज्ञान फायद्याचे ठरू शकतात.  

सध्याच्या पिढीचे स्ट्रेंथ व विकनेस 
सध्याची पिढी ही Tech Savvy आहे. 
अगदी सहजरित्या ते सोशल मीडियाचा वापर करू शकतात. आपटे सर असे सांगतात, ‘‘सोशल मीडिया सध्याच्या पिढीची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे, तर भाषाकौशल्य, Interpersonal Skills, प्रोग्रामिंगचे कौशल्य (त्यामध्ये प्रामुख्याने Coding, Data Structure, Algorithm Development) या काही गोष्टींमध्ये सध्याची पिढी कमजोर आहे. विद्यार्थ्यांनी या गोष्टींवर मनापासून काम केल्यास त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे.

महाराष्ट्र व इतर राज्यांतील विद्यार्थ्यांतील फरक 
महाराष्ट्रीयन विद्यार्थी हुशार असतात मात्र त्यांचे Interpersonal Skills  कमी असतात. भाषा कौशल्य कमी असल्याने ती बुजरी असतात व स्वतःहून पुढाकार घ्यायला धजावत नाहीत. विशेषतः उत्तर भारतातील मुलांमध्ये त्यामानाने आत्मविश्वास जास्त असल्याने ती धीट असतात व स्वतःहून संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. 

भविष्यातील अभियंत्यांसाठी आपला संदेश
फक्त पैशाच्या पाठीमागे न लागता 
असे तंत्रज्ञान निवडा, जे तुमचे पॅशन असेल व त्या तंत्रज्ञानावर अनेक तास 
काम केल्यानंतरही तुम्हाला आनंदच मिळेल. भविष्याच्या दृष्टीने तुम्ही त्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वतःचा विकास करू शकाल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com