शिक्षण आणि खर्च

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 December 2020

देशातील शिक्षणाच्या परिस्थितीवर चर्चा करताना हल्ली दिल्ली या राज्याचा व तेथील होणाऱ्या प्रयोगांची कायमच चर्चा होते. देशभरातील राज्ये शिक्षणासाठी करीत असलेल्या तरतुदींचा विचार केल्यास या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते. दिल्ली आपल्या अर्थसंकल्पाच्या तब्बल २६ टक्के खर्च शिक्षण क्षेत्रातील विविध योजनांसाठी राखून ठेवते.

देशातील शिक्षणाच्या परिस्थितीवर चर्चा करताना हल्ली दिल्ली या राज्याचा व तेथील होणाऱ्या प्रयोगांची कायमच चर्चा होते. देशभरातील राज्ये शिक्षणासाठी करीत असलेल्या तरतुदींचा विचार केल्यास या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते. दिल्ली आपल्या अर्थसंकल्पाच्या तब्बल २६ टक्के खर्च शिक्षण क्षेत्रातील विविध योजनांसाठी राखून ठेवते. त्यामुळे या राज्यातील शिक्षणाची परिस्थिती वेगाने सुधारत असून, सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या व त्यांचा दर्जा चांगलाच सुधारला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्राकडून केली जाणारी तरतूद देशाच्या सरासरीपेक्षा चांगली असली, तरी ही तरतूद वाढण्याची गरज आहे. सरकारी व स्थानिक प्रशासनाकडून चालविल्या जाणाऱ्या शाळांमध्ये चांगल्या सुविधा, दर्जेदार शिक्षक व स्पर्धा आणल्यास त्यांचा दर्जा सुधारतो, हे अनेक उदाहरणांवरून सिद्ध होते. त्यामुळे शिक्षणावरील तरतूद करताना हात अखडता न घेणे आवश्यक आहे.  

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write on Education Expenditure