
काही वर्षांपूर्वी घडलेला हा प्रसंग मला आजही आठवतो. या प्रसंगाने मला कायमस्वरूपी धडा दिल्याने तो माझ्या आजही स्मरणात आहे. एके दिवशीची गोष्ट. मी लिफ्टमधून जात असताना एका व्यक्तीने अचानक लिफ्टमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तिने माझ्याकडे साधे पाहिलेही नाही. तो काहीसा नाराज वाटत होता. त्यामुळे मीच स्वतःहून त्याला विचारले की, सर्वकाही ठीक आहे ना?
काही वर्षांपूर्वी घडलेला हा प्रसंग मला आजही आठवतो. या प्रसंगाने मला कायमस्वरूपी धडा दिल्याने तो माझ्या आजही स्मरणात आहे.
एके दिवशीची गोष्ट. मी लिफ्टमधून जात असताना एका व्यक्तीने अचानक लिफ्टमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तिने माझ्याकडे साधे पाहिलेही नाही. तो काहीसा नाराज वाटत होता. त्यामुळे मीच स्वतःहून त्याला विचारले की, सर्वकाही ठीक आहे ना?
तो म्हणाला, अजिबात नाही. मी काल लिफ्टच्या दिशेने धावत येत होतो. त्या वेळीही तुम्ही लिफ्टमध्ये होता. तुम्ही लिफ्ट थांबवून मला मदत करून आत घेण्यासाठी काहीच केले नाही. मी आश्चर्यचकित झालो.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तो पुढे म्हणाला, ‘‘तुम्ही त्या वेळी क्षणभर माझ्याकडे पाहून दुर्लक्ष केले.’’ तो माझे काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्यामुळे मी त्याची माफी मागितली.
अनेक वेळा आपण आपल्या कोणत्या तरी गाढ विचारात गुंतून जागृत मनाला व्यग्र ठेवतो. अशावेळी आपले सुप्त मन आपल्या कृतींना मार्गदर्शन करत असते. आपण आपल्या जागृत मनाच्या माध्यमातून वर्तमानकाळात आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची नोंद ठेवलीच पाहिजे. हेच जागृत मन आपण इतर गोष्टीत गुंतवल्यामुळे अशी नोंद घेण्यात अपयशी ठरतो. त्या व्यक्तीसोबतही माझ्याकडून नेमकी हीच गोष्ट घडली होती. सुप्त मनामुळे ती व्यक्ती लिफ्टच्या दिशेने येत असल्याचे मी डोळ्यांनी पाहिले होते. मात्र, माझ्याकडून त्या व्यक्तीची नोंद घेतली गेली नाही किंवा तिला लिफ्टमध्ये घेण्यासाठी कोणती शारीरिक कृतीही झाली नाही. खरे तर मी लिफ्टचे दरवाजे उघडे ठेवण्यासाठी लिफ्टचे बटन दाबायला हवे होते. जे घडले ते असे. अर्थात, तेही बरोबरच.
लिफ्टकडे येणाऱ्या त्या व्यक्तीनेही मला हाक मारायला हवी होती. त्यामुळे माझे विचारचक्र थांबले असते. माझे लक्ष तिच्याकडे गेले असते. मात्र, असे घडले नाही. काय म्हणताय? तुमच्या बाबतीतही असेच घडले का? मग तुम्ही हाक मारणे किंवा विचारणे अधिक चांगले. मग ते कुठलेही ठिकाण असो. तुम्हाला काय वाटते?
Edited By - Prashant Patil