इम्प्रूव्ह युअरसेल्फ : ‘सेल्फी’च्या प्रेमात...

रमेश सूद
Thursday, 24 December 2020

‘मी स्वीत्झर्लंडमधील सर्वांत सुंदर पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या इंटरलेकनला भेट दिली, तर सर्वांत पहिल्यांदा मी तेथील आकाशातील सुंदर ढगांबरोबर छानसा सेल्फी काढेन,’ मी माझ्या मित्राला म्हणालो. त्यावर तो म्हणाला, ‘‘जग किती बदलले आहे. यापूर्वी लोक असे एखादे पर्यटनस्थळ पाहायला जात असत. आता ते अशा सुंदर पर्यटनाच्या ठिकाणीही स्वतःलाच पाहायला जात आहेत. किती स्वार्थीपणा आहे हा?’

बदलत्या काळानुसार लोकांच्या मानसिकतेत झालेल्या बदलांबद्दल त्याचा तक्रारीचा सूर होता. तरीही मला त्याच्या बोलण्याची नेमकी खात्री वाटली नाही म्हणून मी त्याला विचारले, ‘तू कधी शाळेमध्ये सर्व मित्रांसोबत एकत्र छायाचित्र घेतले आहे काय?’’ यावर त्याचा चेहरा कोड्यात पडला. त्याने मला विचारले, ‘‘होय, मी शाळेतील मित्रांबरोबर छायाचित्र काढले आहे. तू हे आत्ता का विचारतोयस?’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मी त्याला पुन्हा प्रश्न केला, ‘तुला, हे छायाचित्र मिळाले तेव्हा तू सर्वप्रथम कोणाचा चेहरा शोधलास?’ क्षणभर थांबून तो म्हणाला, ‘अर्थातच माझा.’ आता मी त्याला म्हणालो, ‘मग खरेच काही बदलले आहे का? पूर्वी कॅमेरा सहजपणे उपलब्ध नव्हता. तरीही, तुला तुझी छायाचित्रे पाहावीशी वाटायची. आता सेल्फीचा पर्याय उपलब्ध आहे आणि कॅमेराप्रमाणे रोल संपण्याची भीती नसल्यामुळे कितीही छायाचित्र काढता येतात. तुम्हाला पर्यटनाच्या ठिकाणी किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर सेल्फी घ्यावासा वाटतो, हे ठीक आहे.’’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माझे बोलणे ऐकल्यावर तो म्हणाला, ‘मला वाटते तुझ्या बोलण्यात तथ्य आहे, पण तरीही त्याचा अतिरेक होता कामा नये.’
मी पुन्हा त्याला म्हणालो, ‘या मुद्द्यावर मी तुझ्याशी सहमत आहे.’

कोणत्याही प्रकारचा अतिरेक किंवा व्यसन वाईट असते. त्यामुळे धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे टाळायला हवे. स्वतःवरील प्रेम नैसर्गिक भावना आहे आणि स्वनियंत्रण हा त्याचाच भाग आहे. तुम्ही माझ्याशी सहमत आहात ना?

Edited By - Prashant Patil

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Ramesh Sud on Improve Yourself