इम्प्रूव्ह युअरसेल्फ : दिनक्रम निरोगी आयुष्याचा...

रमेश सूद
Thursday, 31 December 2020

एके दिवशीची गोष्ट. मला अजूनही आठवते, त्या दिवशी मित्रांनी मला ओढतच चित्रपट पाहायला नेले. ‘जाने भी दो यारो’ हा त्या वेळच्या सर्वाधिक मनोरंजनपर चित्रपटांपैकी एक होता. मी मात्र प्रकृती ठीक नसल्यामुळे चित्रपट पाहायला नकार दिला होता. माझे डोके चांगलेच दुखत होते. त्यामुळे मी चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकलो नाही.

एके दिवशीची गोष्ट. मला अजूनही आठवते, त्या दिवशी मित्रांनी मला ओढतच चित्रपट पाहायला नेले. ‘जाने भी दो यारो’ हा त्या वेळच्या सर्वाधिक मनोरंजनपर चित्रपटांपैकी एक होता. मी मात्र प्रकृती ठीक नसल्यामुळे चित्रपट पाहायला नकार दिला होता. माझे डोके चांगलेच दुखत होते. त्यामुळे मी चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकलो नाही. तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी राहणे अत्यंत आवश्यक असते. कारण, त्याशिवाय तुम्हाला चांगले वाटत नाही. तुम्हाला चांगले वाटत नसल्यास तुम्ही कोणत्याही क्षणाला जे काही करता त्याचा आनंद घेऊ शकत नाही.

होय, तुम्ही बदलत्या हवामानामुळे थोडेसे आजारी पडू शकता. मात्र, तुमची प्रतिकारशक्ती चांगली असेल, तर तुम्ही त्यातून लवकर बरे होऊ शकता. यात काही गोष्टींची मदत होऊ शकते. आपल्यापैकी प्रत्येकाने हेही नीट लक्षात घ्यायला हवे की या गोष्टींचे स्मरणही ठेवायला हवे, कारण आपली प्रवृत्ती विसरण्याची असते. ते लक्षात ठेवण्यासाठीच या काही टिप्स.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

  • दररोज किमान ४५ मिनिटे वेगाने चाला. वीस मिनिटे काही व्यायाम करा. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार हे दोन्ही करू शकता.
  • कमी आहार घ्यावा आणि तुम्ही जे काही खाता ते पौष्टिक असण्याची दक्षता घ्या. या आहारातून केवळ चवीचा विचार करू नका, तर तुमच्या पचनसंस्थेलाही आनंदी बनवा.
  • कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहणे, हा तुमचे विचार सकारात्मक ठेवण्याचा चांगला मार्ग आहे. त्यामुळे, तुमच्या शरीरातील पेशींना तुमच्या मनाकडून आनंदाचे सिग्नल्स मिळतील.

माझ्यावर विश्वास ठेवा. यानंतर तुम्हाला निरोगी आणि आनंदी वाटेल. तुम्हालाही हे माहीत आहेच. मी केवळ आठवण करून दिली. मी या सर्व गोष्टींबरोबर आणखी काही गोष्टीही करतो. उगवत्या सूर्याला नमस्कार करतो आणि काही वयोवृद्ध वृक्षांशी बोलतो. सध्याच्या कोरोनाच्या काळात अशा प्रकारचा दिनक्रम अधिक आवश्यक आहे. होय ना?

तुम्ही हे करत नसाल, तर नवीन वर्षाची सुरुवात या जागरूकतेने का करू नये? नववर्षाच्या निमित्ताने हा संकल्प जरूर करा. तुम्हाला निश्चितच फायदा होईल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Ramesh Sud on Improve Yourself Health