- श्रीकांत महाडिक, सहाय्यक प्राध्यापक
सध्याच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)आणि डेटा सायन्सने प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, इंडस्ट्री 4.0, ऑटोमेशन, रोबोटिक्स, सायबर फिजिकल सिस्टीम्स, आणि डिजिटल ट्विन्स यांसारख्या संकल्पनांनी यांत्रिकी अभियांत्रिकीचे स्वरूपच बदलून टाकले आहे.
यामध्ये ‘एआय’चा वापर करून यंत्रांची स्वतःहून निर्णय घेण्याची क्षमता वाढवली जाते, तर डेटा सायन्सचा वापर मशिनवरील सेन्सर्समधून मिळणाऱ्या मोठ्या प्रमाणातील डेटाचे विश्लेषण करण्यासाठी केला जातो.