Success Story: 13 लाखांची ExxonMobilची कॉर्पोरेट नोकरी सोडून बनली आर्मी ऑफिसर! कोण आहेत NIT इंजिनीअर अथिरा सुरेश?

Athira Suresh Success Story: NIT कालीकटमधून सिव्हिल इंजिनीअरिंग केल्यानंतर अथिरा सुरेश यांनी ExxonMobilमधील कॉर्पोरेट करिअर सोडून भारतीय लष्कराची वाट निवडली. SSB पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना OTA गया येथे प्रशिक्षण मिळाले आणि 5 सप्टेंबरला लेफ्टनंट म्हणून कमिशन मिळाले.
Success Story Army

NIT Engineer Leaves ExxonMobil Job to Join Indian Army, Meet Lieutenant Athira Suresh

eSakal

Updated on

NIT Engineer Leaves ExxonMobil Job to Join Indian Army: अनेकांचे स्वप्न असते की, उच्च दर्जाच्या शिक्षण संस्थेतून शिक्षण घेऊन मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळवावी. मात्र, हे सगळं मिळाल्यानंतर मोठ्या पगाराची नोकरी सोडून देशसेवेची वाट निवडणं सोपं नसतं. केरळमधील कोझिकोडच्या अथिरा सुरेश यांनी मात्र हे करून दाखवलं. NIT कालीकटमधून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी ExxonMobil या जगातील आघाडीच्या ऊर्जा कंपनीत Project Controls Engineer म्हणून काम केलं. मात्र, पुढे त्यांनी कॉर्पोरेट नोकरी सोडून भारतीय लष्करात जाण्याचा निर्णय घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com