विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा ध्यास (राजेंद्र सिंग)

राजेंद्र सिंग
Wednesday, 18 December 2019

अत्याधुनिक प्रशिक्षण व सुविधा 
व्हर्च्युअल रिॲलिटी लॅब
प्रयोगात्मक शिक्षणावर भर 
स्पोर्टस सिलेक्‍ट प्रोग्रॅम
फोनामिक इंटेलिजन्स टेक्‍नॉलॉजी 

पुरस्कार 
बेस्ट स्टेट करिक्‍युलम
बेस्ट नॅशनल करिक्‍युलम
बेस्ट स्कूल फॉर एक्‍स्ट्रा
करिक्‍युलर ॲक्टिव्हिटी
एशियाज ग्रेटेस्ट ब्रॅड
बेस्ट इनोव्हेटिव्ह लर्निंग स्कूल ॲवाॅर्ड
नंबर सिक्‍स इन इंडिया फॉर सोशल इम्पॅक्‍ट बाय 
एज्युकेशन वर्ल्ड
बजेट प्रायव्हेट स्कूल कॅटॅगरीत भारतात दहावा, महाराष्ट्रात सहावा व पुण्यात प्रथम क्रमांक

समाजातील प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण देऊन शिक्षित करणे हा ध्यास मनात ठेवून केवळ पाच विद्यार्थी सोबत घेऊन पाया रोवला गेला. संस्थेचे प्रमुख इंद्रमन सिंग यांनी या संस्थेचा केलेला विस्तार वाखाणण्याजोगा आहे. पंधरा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी आज या संस्थेत शिक्षण घेत आहेत. संस्थेच्या इंद्रायणीनगर, भोसरी, चाकण, आळंदी आणि मोशी या ठिकाणी शाखा कार्यरत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ही आवडते मज मनापासुनि शाळा!
लाविते लळा ही जसा माऊली बाळा!

या उक्तीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात ही भावना रुजविण्याचे काम प्रियदर्शिनी स्कूलने केले आहे. ‘प्रियदर्शिनी स्कूल’चा वटवृक्ष मोठा झाला आहे. संस्थेचे प्रमुख इंद्रमन सिंग यांनी या संस्थेचा केलेला विस्तार वाखाणण्याजोगा आहे. शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. परंतु समाजातील प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण देऊन शिक्षित करणे हा ध्यास मनात ठेवून केवळ पाच विद्यार्थी सोबत घेऊन पाया रोवला गेला.

आता सुमारे पंधरा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी आज या शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहेत. आज संस्थेच्या इंद्रायणीनगर, भोसरी, चाकण, आळंदी व मोशी या ठिकाणी शाळा कार्यरत आहेत. इंद्रमन सरांच्या पावलावर पाऊल ठेवूनच त्यांची मुले जितेंद्र, महेंद्र, सरिता, राजेंद्र आणि नरेंद्र यांनी शाळेची धुरा सांभाळली आहे. संस्थेच्या या वटवृक्षाचा विस्तार आणखी विशाल होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शाळा प्रयत्नशील आहे. 

प्रत्येक मुलामध्ये सुप्त गुण दडलेले असतात. कोणी हुशार किंवा कमी हुशार असे काही नसते. मुलांमधील हे गुण ओळखून त्यांना योग्य दिशा दाखविणे आवश्‍यक असल्याचे राजेंद्र सिंग मानतात आणि संस्थेच्या माध्यमातून ते अमलातही आणतात. ‘आय एम ओके ॲज आय एम’ हे संस्थेचे ब्रीदवाक्‍य आहे. म्हणूनच प्रियदर्शिनी स्कूल इतरांपेक्षा वेगळी ठरते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव कसा देता येईल यासाठी राजेंद्र सिंह यांनी जगभरातील व देशातील अनेक संस्थांना भेटी दिल्या. जगभरातील शिक्षणपद्धती भारतीय शिक्षण संस्कृतीत कशा बसतील, याचा त्यांनी अभ्यास केला. याद्वारे पुस्तकीज्ञानापेक्षा प्रयोगाच्या व अनुभवाच्या माध्यमातून शिक्षण सोपे करून कसे शिकवता येईल, याकडे त्यांचा कल असतो. एखादी संकल्पना समजावून देताना ती चित्राच्या माध्यमातून दिली तर ती लवकर समजते व दीर्घकाळ स्मरणात राहते.

म्हणून संस्थेने व्हर्च्युअल रिॲलिटी लॅब सुरू केली आहे. प्रत्येक मूल हे वेगळे असते, असे ते मानतात. म्हणूनच त्यांच्या कलागुणांना ओळखून जर त्यांना घडविले, तर ते खऱ्या अर्थाने एक आदर्श नागरिक बनू शकतात. हा आदर्श विचार मनात ठेवूनच विद्यार्थ्यांचा भावनिक, मानसिक, शारीरिक व शैक्षणिक असा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. यासाठी शाळेमध्ये वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. शाळेमध्ये प्रात्यक्षिक शिक्षणावर भर दिला जातो. ज्युनिअर इंजिनिअरिंग लॅब ही मुलांच्या बौद्धिक विकासावर काम करते. गेल्या सहा वर्षांपासून शाळेमध्ये स्टेप रेमेडियल सुरू करण्यात आले असून प्रशिक्षित कॉन्सेलर व रेमेडिअल ट्यूटरची टीम कार्यरत आहे. स्पोर्टस सिलेक्‍ट प्रोग्रॅम हा मुलांचा शारीरिक विकास आणि तंदुरुस्तीसाठी काम करतो. अनुभवातून शिक्षण या कौशल्याचा विकास होण्यासाठी हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन करून घेतलेल्या फोनामिक इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. 

साक्षर होत असलेल्या कोणत्याही भावी समाजाचा पाया पूर्वप्राथमिक व प्राथमिक शिक्षणप्रणालीवर अवलंबून आहे. हे लक्षात घेऊनच मूलभूत पायाभरणीवर संस्थेचा भर आहे. त्या दृष्टिकोनातून संस्था कार्यरत आहे. केवळ पिंपरी-चिंचवड विभागात नव्हे, तर पुणे शहरात संस्थेचा विस्तार कसा होईल, यासाठी संस्था कार्यरत आहे. संस्थेच्या प्रत्येक शाखेमध्ये समाजाच्या विविध स्तरांतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात शाळेचे ब्रीदवाक्‍य रुजविले जात आहे. प्रत्येक विद्यार्थी सृजनशील कसा बनेल, याकडे संस्थेचा कल आहे. तंत्रज्ञानामुळे होत असलेले बदल सहज आत्मसात करू शकतील, यासाठी संस्था सतत कार्यशील आहे. यात पालकांचा समावेश कसा करता येईल, याचा विचार होत आहे. 

प्रियदर्शिनी स्कूल ही केवळ एक शैक्षणिक संस्था नसून एक कुटुंब आहे. या संस्थेमध्ये सुमारे पाचशेहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षकांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात येते. त्यांच्यासाठी वेळोवेळी कार्यशाळा आयोजित केल्या जातात. प्रियदर्शिनी स्कूल पुणे जिल्ह्यात प्रथम, तर राज्यात सहाव्या क्रमांकावर व देशामध्ये दहाव्या क्रमांकावर आहे. एज्युकेशन वर्ल्ड या संस्थेच्या वतीने गुणवत्तापूर्ण शाळांसाठी गौरविल्या जाणाऱ्या ‘बजेट प्रायव्हेट स्कूल’ यासाठी इंद्रायणीनगर येथील ही शाळा अव्वल ठरली आहे. तसेच एशिया वन या जागतिक संस्थेने सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार प्रियदर्शिनी स्कूलने एशियाज ग्रेटेस्ट ब्रॅंड हा बहुमान मिळविला. याच संस्थेने एशियाज ग्रेटेस्ट लीडर या बहुमानाने राजेंद्र सिंह यांना गौरविले आहे. त्याचबरोबर शाळेलाही विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.

उत्कृष्ट शाळा ही आपल्या विद्यार्थ्याला, समाजाला आणि नकळतपणे स्वत:लाही घडवत असते. संस्थाचालक म्हणून काम पाहताना कितीही अडचणी आल्या तरी त्याकडे एक संधी म्हणून पाहतो व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतो.  
- राजेंद्र सिंग, सीईओ, प्रियदर्शनी स्कूल्स


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awareness of student progress Rajendra Singh