हल्लीच्या काळात नोकर-उद्योगातील अस्थिरता, वाढते खर्च, महागाई, शिक्षण-आरोग्याचे प्रश्न यांसह विविध कारणांमुळे गुंतवणूक करणं, आर्थिक नियोजन करणं प्रत्येकासाठी अपरिहार्य झालं आहे. गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध असताना नेमका कोणता पर्याय निवडायचा? किती काळासाठी, कशी गुंतवणूक करायची? ही आपली गरज ओळखून त्यानुसार अचूकपणे सांगण्याचं काम अर्थ किंवा गुंतवणूक सल्लागार करतात.