Bank job | बँक ऑफ बडोदामध्ये अभियंत्यांची भरती; मुलाखतीद्वारे होणार निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bank job

Bank job : बँक ऑफ बडोदामध्ये अभियंत्यांची भरती; मुलाखतीद्वारे होणार निवड

मुंबई : बँक ऑफ बडोदामध्ये आयटी प्रोफेशनल्सच्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 नोव्हेंबर 2022 आहे.

हेही वाचा: Government job : पुढील ६ महिन्यांत होणार मोठी भरती; सरकारी नोकरीची संधी

रिक्त जागांचा तपशील

अधिसूचनेनुसार, सीनियर डेव्हलपरसाठी 16 जागा - फुल स्टॅक जावा, डेव्हलपरसाठी - फुल स्टॅक जावा साठी १३ जागा, डेव्हलपरसाठी - फुल स्टॅक डॉट नेटसाठी १३ जागा आणि जावा ६ पदे, डेव्हलपर - मोबाइल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी ६ जागा, क्वालिटी अॅश्युरन्स अभियंताच्या ६ जागा, गुणवत्ता हमी अभियंत्यांची 6 पदे, कनिष्ठ गुणवत्ता हमी अभियंत्यांच्या 5 पदांसह एकूण 60 पदांची भरती होणार आहे.

पात्रता

उमेदवारांनी मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थेतून संगणक विज्ञान किंवा IT मध्ये BE/B.Tech पदवी उत्तीर्ण केलेली असावी. यासोबतच उमेदवारांकडून अनुभवही मागवण्यात आला आहे. वेगवेगळ्या पदांसाठी अनुभव वेगळा असतो.

हेही वाचा: Government job : पुढील ६ महिन्यांत होणार मोठी भरती; सरकारी नोकरीची संधी

निवड अशी होईल

उमेदवारांची निवड शॉर्ट लिस्टिंग आणि वैयक्तिक मुलाखत आणि इतर कोणत्याही निवड पद्धतीच्या आधारे केली जाईल.

अर्ज शुल्क

जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसीसाठी अर्ज शुल्क 600 रुपये आहे.

SC, ST, PWD आणि महिला उमेदवारांसाठी अर्जाची फी 100 रुपये आहे.

याप्रमाणे अर्ज करा

इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in/Career.htm वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.