Banking jobs | बँक ऑफ बडोदामध्ये पदवीधरांसाठी नोकरीची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Banking jobs

Banking jobs : बँक ऑफ बडोदामध्ये पदवीधरांसाठी नोकरीची संधी

मुंबई : तुम्हाला बँकिंग जॉबमध्ये रस असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) ने वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर, ग्रुप सेल्स हेड यांसारख्या विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

या पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे एकूण 346 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 20 ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात येईल. (Bank Of Baroda Vacancy 2022)

हेही वाचा: Bank account : बँक खात्यात शून्य रुपये असतील तरीही काढू शकता १० हजार रुपये

एकूण पदे - 346

वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर - 320 पदे

ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर - 24 पदे

गट विक्री प्रमुख - 1 पद

ऑपरेशन हेड वेल्थ – 1 पोस्ट

वय मर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय २४ वर्षे आणि कमाल वय ५० वर्षे आहे.

हेही वाचा: वृद्धांसाठी आनंदाची बातमी ! मिळणार ३६ हजार रुपये पेन्शन

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील पदवी असणे आवश्यक आहे.

अर्ज फी

सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 600 रुपये भरावे लागतील तर SC, ST आणि PWD श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये भरावे लागतील.

निवड प्रक्रिया

या पदांवर निवड होण्यासाठी, उमेदवारांना मुलाखत किंवा जीडी प्रक्रियेतून जावे लागेल.