कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना घेता येणार प्रवेश
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यापीठातील 'डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्स' (पुम्बा) मध्ये 'बीबीए इन हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटीज मॅनेजमेंट'च्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकणार आहेत. विद्यापीठातील 'डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्स' मध्ये अनेक अभ्यासक्रम चालवले जातात. त्यापैकी हा 'बीबीए' चा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कला, वाणिज्य, विज्ञान व व्होकेशनल अशा कोणत्याही शाखेतून इंग्रजी हा विषय घेऊन बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के तर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण आवश्यक आहेत.
अभ्यासक्रमाबाबत अधिक माहिती देताना विभागाच्या प्रमुख डॉ. सुरभी जैन म्हणाल्या, "वेगाने वाढत असलेल्या क्षेत्रात संधी उपलब्ध व्हावी, या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमाची रचना केली आहे. यामध्ये प्रात्यक्षिक, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रत्यक्ष सहभाग, उद्योग जगताशी ओळख अश्या अनेक अंगांचा समावेश केला आहे."
फॅसिलिटीज मॅनेजमेंट' क्षेत्रात संधी
'फॅसिलिटीज मॅनेजमेंट' क्षेत्रात आपण चांगले संबंध प्रस्थापित करण्यात यशस्वी झालो असल्याने नव पदवीधरकांना नोकरीची संधीही उपलब्ध करून देऊ शकू. मात्र या अभ्यासक्रमाची व्याप्ती पदवीपर्यंत मर्यादित नसून पुढील काळात 'फॅसिलिटी मॅनेजमेंट' क्षेत्रात अनेक संधी निर्माण करणारी आहे."
- डॉ. प्रफुल्ल पवार, संचालक, स्कुल ऑफ बिजनेस आणि कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
अधिक माहितीसाठी : http://www.pumba.in/program/mba-bba-process.htm
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.