'डिस्टन्स'मधून B.Ed करायचं आहे? जाणून घ्या किती वर्षाचा कोर्स अन् महत्वपूर्ण माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BEd Distance Course

अध्यापन कार्य ही भारतातील अत्यंत सन्मानजनक आणि सुरक्षित नोकरी मानली जाते. शिक्षक म्हणून नोकरी मिळविण्यासाठी आपल्याकडे बॅचलर ऑफ एजुकेशन (बीएड) असणे आवश्यक आहे.

'डिस्टन्स'मधून B.Ed करायचं आहे? जाणून घ्या किती वर्षाचा कोर्स अन् महत्वपूर्ण माहिती

BEd Distance and Online : अध्यापन कार्य ही भारतातील अत्यंत सन्मानजनक आणि सुरक्षित नोकरी मानली जाते. शिक्षक म्हणून नोकरी मिळविण्यासाठी आपल्याकडे बॅचलर ऑफ एजुकेशन (बीएड) (Bachelor of Education) असणे आवश्यक आहे. 'बीएड डिग्री' (BEd Distance Course) ही तुमच्यासाठी अध्यापनाच्या नोकरीचा दरवाजा उघडते. त्याचबरोबर, दूरशिक्षणाचे बीएड अभ्यासक्रम भारतात अधिक प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. कारण, बर्‍याच तरुणांना नोकरी मिळविण्यासाठी बीएड पदवी त्यांच्याकडे असणे आवश्यक वाटते. त्यामुळे शिक्षक होण्यासाठी बीएड पदवी नोकरीसाठी उपयुक्त ठरत आहे. (Bed Distance And Online Know The Details Of Bed-With Distance Education Read About Online Teaching Certificate Course)

बॅचलर्स ऑफ एज्युकेशन हा दोन वर्षाचा अभ्यासक्रम आहे, तर काही विद्यापीठांत हा कोर्स 'बीएड डिस्टन्स कोर्स' म्हणून एक वर्षाचा देखील आहे. शिक्षक होण्याच्या दृष्टीने बीएड हा एक महत्वाचा कोर्स मानला जातो. यामध्ये आपल्याला नैतिक मूल्यांपासून संवेदनशीलता आणि जबाबदाऱ्यांपर्यंत आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. सध्या विविध विद्यापीठ अथवा संस्थांमध्ये बीएडसाठी दूरशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आला आहे. मात्र, आपण आपल्या आवडीनुसार महाविद्यालय निवडू शकता.

दूर शिक्षणमधून बीएड कोर्स देणारी विद्यापीठे व संस्था

 • इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ

 • स्वामी विवेकानंद विद्यापीठ

 • मदुरै कामराज विद्यापीठ

 • जामिया मिलिया इस्लामिया

 • अन्नामलाई विद्यापीठ

 • राष्ट्रीय करस्पॉन्डेंस महाविद्यालय

 • महर्षि दयानंद विद्यापीठ

 • यूपी राजश्री टंडन मुक्त विद्यापीठ

 • रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ

 • मध्य प्रदेश भोज मुक्त विद्यापीठ

 • जेएस विद्यापीठ

 • डिस्टन्स शिक्षण संचालनालय, जम्मू विद्यापीठ

 • दूरशिक्षण संचालनालय, कुरुक्षेत्र विद्यापीठ

बीएडसाठी 'ही' पात्रता असावी

बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी किमान 50% गुणांसह पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठीही पर्याय

ऑनलाइन मोडमध्ये आपल्याला अल्पकालीन शिक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम करायचा असल्यास, आपल्यासाठी पर्याय आहेत. यात शैक्षणिक तंत्रज्ञान कंपन्या, वेबसाइट्स किंवा ओपन ऑनलाइन कोर्स देखील उपलब्ध आहेत, जे अल्प मुदतीसाठी ऑनलाइन शिक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करतात. यापैकी Coursera, edX, Alison, AcademicEarth, Udemy, FutureLearn इत्यादींचा समावेश आहे.

Bed Distance And Online Know The Details Of Bed-With Distance Education Read About Online Teaching Certificate Course

टॅग्स :BEd Certificate Course