
रीना भुतडा - करिअर समुपदेशक
कायदा म्हणजे व्यक्ती, संस्था आणि शासन यांच्यातील परस्पर संबंधांचे नियम. हे नियम न्याय, अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांवर आधारित असतात. कायद्याच्या माध्यमातून समाजात सुव्यवस्था, शिस्त आणि शांतता राखली जाते. त्यामुळे वकिली हे एक मानाचे, प्रतिष्ठेचे आणि जबाबदारीचे क्षेत्र मानले जाते.