
नवी दिल्ली: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडतर्फे (BEL) ट्रेनी इंजिनिअर-I पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना २४ सप्टेंबर २०२५ ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. अर्ज BEL च्या अधिकृत संकेतस्थळ bel-india.in यावर स्वीकारले जातील.