बंगळुरूमध्ये काम करणा-या एका साॅफ्टवेअर इंजिनिअरने एक कोटी पगाराची आरामदायी नोकरी सोडली आहे, त्याने हा निर्णय घेतला तेव्हा त्याच्याकडे दुसरी कोणत्याही जाॅबची आॅफर नव्हती किंवा कोणताही बॅकअप नव्हता. इंजिनिअरच्या या निर्णयामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. वरुण हसीजा नावाच्या या इंजिनिअरने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले आहे की, त्याने आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय घेतला आहे.