

The Rapid Evolution of Implantable Biomaterials
Sakal
डॉ. राजेश ओहोळ (करिअर मार्गदर्शक)
संशोधनाच्या वाटा
बायोमटेरिअल्स हे बायोमेडिकल इंजिनिअरिंगचा भाग आहे. बायोमटेरिअल्स शास्त्र, अभियांत्रिकी, जीवशास्त्र आणि वैद्यकशास्त्र यातील ज्ञान एकत्र आणतात. वाढत्या प्रमाणात बहुगुणी आणि प्रभावी इम्प्लांटेबल बायोमटेरिअल्सची आणि बायोमटेरिअल्स डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात संशोधन आणि विकासासाठी पात्र संशोधकांची आवश्यकता आहे. नवीन बायोमटेरिअल्स, कोटिंग्ज आणि डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञान (बायोमिमेटिक बायोमटेरिअल्स, फंक्शनल बायोमटेरिअल्स, नॅनोटेक्नॉलॉजी, फायनाईट एलिमेंट मॉडेलिंग, अॅडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग, त्रिमितीय (३-डी), टिश्यू इंजिनिअरिंग आणि ड्रग डिलिव्हरी) इत्यादी गोष्टींच्या संयोजनाद्वारे इम्प्लांटेबल बायोमटेरिअल्समध्ये नवनवीन डिझाइन निर्मिती होत आहे. ते इम्प्लांटच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणतील.