जैवतंत्रज्ञान : शाश्वत पर्याय शोधण्याची वृत्ती हवी

औद्योगिक जैवतंत्रज्ञान कंपनीमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराकडे शाश्वततेचा विचार
Biotechnology
Biotechnologysakal
Updated on

शिक्षण व्यवस्था आणि समाजामध्ये वाढत असलेल्या स्वातंत्र्यांबरोबरच आता कोणत्याही मुलापुढे करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मुख्य प्रवाहातील इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्रातील करिअर पर्यायांशिवाय अनेक मुले आता करिअरच्या वेगळ्या वाटा चोखाळत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, डेटा सायन्स, डिजिटल मार्केटिंग, मायक्रोबायॉलॉजी, जैवतंत्रज्ञान आणि फॉरेन्सिक विज्ञानासारख्या वेगळ्या पर्यायांना चांगले भविष्य आहे. त्यामुळे या क्षेत्रांचा विचार आता होताना दिसतो.

औद्योगिक जैवतंत्रज्ञानाचा विचार करता, केमिकल, मॅकेनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या इंजिनिअरिंग शाखांमधील शिक्षण आणि प्रकल्प व्यवस्थापन कौशल्य असेल, तर त्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात चांगल्या संधी मिळतात. जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र आणि जैवरसायनशास्त्र या व्यावहारिक विज्ञान क्षेत्रातील शिक्षण असेल, तर संशोधन आणि विकास लॅबोरटरीजमध्ये आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यात मदत होते.

औद्योगिक जैवतंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्यांना डेटा ॲनॅलिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, कॉम्प्युटर एंडेड ड्रॉईंग्ज अँड मॅन्युफॅक्चरिंग (CAD-CAM) आधुनिक युगातील कौशल्ये आणि रोबोटिक्स याचाही फायदा होतो.

ध्यास शाश्‍वततेचा

औद्योगिक जैवतंत्रज्ञान कंपनीमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराकडे शाश्वततेचा विचार करणारी मानसिकता आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा ध्यास या दोन गोष्टी असणे अत्यावश्यक आहे. नावीन्यपूर्ण आणि शाश्वत पर्याय शोधण्याची, विकसित करण्याची आणि त्याचे उपयोजन करण्याची उत्कट इच्छा हे त्या उमेदवाराच्या केंद्रस्थानी असले पाहिजे.

तांत्रिक-व्यावसायिक व्यावहारिकतचा आणि कोणत्याही पर्यायाचा सांगोपांग विचार करून तो सोपा करण्याची क्षमता हीदेखील महत्त्वाची कौशल्ये आहेत. ग्राहकाच्या व्यक्त आणि अव्यक्त गरजा ओळखणे आणि त्या पूर्ण करण्यासाठी त्यादृष्टीने अगदी समर्पक असा उपाय शोधण्याची क्षमता यासारखे ग्राहककेंद्री दृष्टिकोन हे ग्राहकांच्या अनुभवासाठी आणि ग्राहकांशी दीर्घकालीन संबंध प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरतात. न्यू नॉर्मल जगात काम करण्यासाठी एकाच वेळेस अनेक कौशल्ये असणे हे वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आणि टीमबरोबर काम करताना फायदेशीर ठरते.

करिअरसाठी हे हवेच...

बायोइन्फरमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, एन्झेम कायनेटिक्स, मोलेक्युलर बायॉलॉजी, बायोमेडिकल (जैव वैद्यकीय) आणि फॉरेन्सिक विज्ञान यासारखे पुरवणी अभ्यासक्रमही ज्ञान आणि विशेष नैपुण्य मिळवण्यासाठी उपयोगी पडते. औद्योगिक जैवतंत्रज्ञान क्षेत्रात विविध कौशल्ये आत्मसात करताना आणि आपल्या क्षमतांचा विकास करताना तांत्रिक, अतांत्रिक, व्यावसायिक नीतिशास्त्र आणि अन्य कौशल्ये असतील तर त्याचा नक्कीच फायदा होतो.

या क्षेत्रातील करिअरसाठी याच गोष्टी अवश्य पाहिल्या जातात. BioMobility TM आणि BioPrism हे बायोइकॉनॉमीचे दोन मुख्य आधारस्तंभ आहेत. यामुळे वाहतूक आणि कार्बन पुनर्वापराचे शाश्वत डिकार्बनायझेशन (कार्बन उत्सर्जन) सुलभ होते. जागतिक शाश्वत विकासाच्या १७पैकी (SDGs) ११ उद्दिष्टांचा बायोइकॉनॉमीमध्ये समावेश होतो आणि राष्ट्रीय निर्धारित योगदानही (NDCs) यामुळे पूर्ण होतात.

COP-२१ पॅरिस करारामध्ये आश्वस्त केल्याप्रमाणे तापमान वाढ २ अंश सेल्सिअसच्या खाली आणण्यासाठी आणि COP-२६मध्ये वचन दिल्याप्रमाणे २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यापर्यंत आणण्यामध्ये (Net Carbon Zero by 2070) भारतात बायोइकॉनॉमी खूप उपयुक्त ठरू शकते, असा ठाम विश्वास आम्हाला आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेण्यासाठी तशी कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहेत.

यशस्वी होण्यासाठी...

इंजिनिअरिंगच्या विविध शाखांसोबतच प्रकल्प व्यवस्थापन कौशल्य आवश्यक.

कोणत्याही पर्यायाचा सांगोपांग विचार करून तो सोपा करण्याची क्षमता

क्षमता विकासासाठी तांत्रिक, अतांत्रिक, व्यावसायिक नीतिशास्त्र कौशल्ये आवश्यक

(लेखक प्राज इंडस्ट्रीजचे सीएफओ आणि डायरेक्टर (ह्यूमन रिसोर्स) आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com