BIS Recruitment 2022 | पदवीधर अभियंत्यांची भरती; पगार मिळणार ५० हजार रुपये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BIS Recruitment 2022

BIS Recruitment 2022 : पदवीधर अभियंत्यांची भरती; पगार मिळणार ५० हजार रुपये

मुंबई : ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ने अभियंता पदांसाठी भरती सुरू केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट bis.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. बीआयएस उत्पादनांचे मानकीकरण, चिन्हांकन आणि गुणवत्तेशी संबंधित बाबींसाठी जबाबदार असते. (BIS Recruitment 2022)

हेही वाचा: Post Office Scheme : १० वर्षांचे मूल घरबसल्या कमवेल पैसे

एकूण पदे - १००

वय मर्यादा

अभियंता पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की त्यांचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

शैक्षणिक पात्रता

संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा BE/B. EEE/FCT/MCM मध्ये MTech असणे आवश्यक आहे.

अर्ज फी

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

पगार

50,000 प्रति महिना

हेही वाचा: Save Electricity : या ३ उपकरणांचा वापर थांबवा; वीजेचे बिल होईल अर्ध्याहून कमी

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेत उमेदवारांना प्रथम शॉर्टलिस्ट केले जाईल. त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना व्यावहारिक मूल्यमापन, लेखी मूल्यांकन, तांत्रिक ज्ञान मूल्यांकन आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

नोकरी स्थान

पदवीधर अभियंत्याला आवश्यकतेनुसार देशात कोठेही पोस्ट केले जाऊ शकते.

कामाचे स्वरूप

१.- कारखाना तपासणी अहवाल (IR) आणि चाचणी अहवाल (TR) तपासणे.

२.- बाजार नमुन्यांच्या चाचणी अहवालांची (TR) तपासणी.

३.- मार्केट मॉनिटरिंग सेलचे व्यवस्थापन.

४. शोध आणि जप्तीच्या संचालनात प्रमाणन अधिकाऱ्यांना सहाय्य करणे

५- गुन्हेगारांवर खटला चालवण्यात बीओच्या प्रमुखांना मदत करणे.

६.- BIS द्वारे नियुक्त केलेले इतर कोणतेही काम.

टॅग्स :Recruitment