Essential Steps to Attain Freedom from Fear
sakal
आपण गेल्या भागात भीतीबाबत म्हणजे ऑबेसिव्ह कम्पलसिव्ह डिसआर्डर (ओसीडी) बाबत माहिती घेतली. त्याची लक्षण समजून घेतली. ओसीडीमध्ये पुढील विचार असू शकतात. –
१. मला जंतुसंसर्ग होईल. माझ्यामुळे इतरांना लागण होईल.
२. मी स्वत:ला किंवा इतरांना इजा करून घेईन.
३. अतिशयोक्त लैंगिक किंवा हिंसात्मक विचार किंवा प्रतिमा
४. अतिशयोक्त धार्मिक विचार किंवा मूल्य विषयक विचार
५. अपयशाची वाटणारी अतार्किक भीती
६. प्रत्येक गोष्ट नेहमीच अति व्यवस्थित, अति पद्धतशीर, अतियोग्य असलीच पाहिजे.
७. एखादी गोष्ट मला लकी किंवा अनलकी आहे या विषयीची पराकोटीची अंधश्रद्धा.