Job Opportuities : येत्या तीन वर्षीत या क्षेत्रात ६५ लाख नोकऱ्या अन् ब्राईट करियरची संधी

२०२० मध्ये ७१ कोटी तरुण इंटरनेट वापरायला लागले. आज ८३ कोटीच्या जवळपास लोक याचा वापर करत आहेत.
Job Opportuities
Job Opportuitiesesakal

Bright Career And Job Opportunities : तंत्रज्ञानात प्रगती आणि वाढतं डिजिटलायझेशन यामुळे भविष्याचा कल डिजिटल क्षेत्राकडे आहे हे ओळखून अनेक उद्योग आणि अर्थ व्यवस्था डिजिटल क्षेत्राच्या दिशेने वाटचाल करत आहे. १५ वर्षांपूर्वी या क्षेत्राचं अस्तित्वच नव्हतं.

सुरूवातीला इंटरनेट फक्त शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात वापरलं जात होतं. २०२० मध्ये ७१ कोटी तरुण इंटरनेट वापरायला लागले. आज ८३ कोटीच्या जवळपास लोक याचा वापर करत आहेत. पण २००८मध्ये जेव्हा गुगलचं सर्च इंजिन सुरू झालं तेव्हा बऱ्याच कंपन्यांसाठी ती एक जादूची छडी फिरल्यासारखं होतं.

Job Opportuities
Job Offer : उंदरं पकडण्यासाठी हवीत माणसं; सरकारनं जाहीर केला पगाराचा आकडा

सीजीआर रिपोर्टनुसार २०२३ मध्ये भारतीय कंपन्यांद्वारे डिजिटल मार्केट सेक्टरमध्ये ३५ हजार ८०९ कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. देशात सध्या डिजिटल मार्केटिंग कॅपिटल २०० अब्ज डॉलर्सच्या जवळ आहे.

Job Opportuities
Government Job : १३ हजार तरुणांना सरकारी नोकरीची संधी; इथे होणार मोठी भरती

मँकिंसे ग्लोबल इंस्टिट्यूट (एमजीआय) च्या रिपोर्टनुसार डिजिटल मार्केटिंग सेक्टरमध्ये २०२५ पर्यंत ६०-६५ लाख नोकऱ्या निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंडस्ट्रीला स्कील्ड लोकांची आवश्यकता आहे. त्यामुळे १२ वी, पदवी नंतर डिजिटल मार्केटींग क्षेत्रात करिअरची उत्तम संधी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com