Career opportunities : डेटा विश्लेषणात वाढतील करिअरच्या संधी; कौशल्य, सराव आणि नवे तंत्र आत्मसात करण्याची गरज
Data Analytics : डेटा विश्लेषणाच्या क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून कौशल्यविकास केल्यास यश मिळण्याची शक्यता वाढेल.
छत्रपती संभाजीनगर : डिजिटल युगात डेटा ही नवी संपत्ती मानली जाते. विविध उद्योग आणि क्षेत्रांमध्ये डेटा विश्लेषणाच्या मदतीने व्यावसायिक निर्णय घेतले जातात; तसेच संशोधनातही डेटा ॲनालिसिसचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.