पुणे - राज्यातील जवळपास २४७ नर्सिंग महाविद्यालयांमधील बी.एस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १७ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.