
BSF भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
बीएसएफमध्ये बंपर भरती; 2788 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
BSF Constable Recruitment 2022 : BSF भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सीमा सुरक्षा दलामध्ये (BSF) शिंपी, स्वयंपाकी, वॉशरमन, बार्बर, सफाई कामगार, सुतार, पेंटर, इलेक्ट्रीशियन, ड्रॉफ्ट्समन, वेटर आणि माळी या व्यवसायातील पदांसाठी आज 1 मार्चपासून भरतीची (Border Security Force) प्रक्रिया सुरु झालीय. यासाठी ज्या उमेदवारांनी अद्याप BSF कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज केलेला नाही, त्यांनी अधिकृत भरती पोर्टलवर rectt.bsf.gov.in आपला ऑनलाइन अर्ज करु शकतात. BSF कडून 16 जानेवारी 2022 रोजी विविध ट्रेडमधील 2788 कॉन्स्टेबल ट्रेड्समनच्या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
केंद्रीय गृह मंत्रालय, भारत सरकार (Government of India) अंतर्गत सीमा सुरक्षा दलात 2788 कॉन्स्टेबल ट्रेड्समन पदांपैकी कुकसाठी सर्वाधिक 897 रिक्त जागा आहेत. त्याचबरोबर वेटर 510, वॉशरमन 338, सफाई कामगार 617 आणि बार्बरच्या 123 जागा रिक्त आहेत. BSF नं जवळपास सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विविध ट्रेडसाठी कॉन्स्टेबल ट्रेडसमनच्या रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.
पात्रता
BSF कडून जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदांसाठी दहावी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. दरम्यान, उमेदवारांकडं एक वर्षाचं आयटीआय प्रमाणपत्र किंवा संबंधित व्यापारात दोन वर्षांचा कामाचा अनुभव असावा. तसेच 1 ऑगस्ट 2021 रोजी उमेदवाराचं वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 23 वर्षांपेक्षा जास्त नसावं. राखीव प्रवर्गातील (SC, ST, OBC इत्यादी) उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आलीय.