esakal | भारतीय नौदलात 2500 जागांसाठी बंपर भरती; आजच करा अर्ज

बोलून बातमी शोधा

Indian Navy
भारतीय नौदलात 2500 जागांसाठी बंपर भरती; आजच करा अर्ज
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : Navy Sailor Application 2021 : भारतीय नौदलात नौदल अथवा सेलर भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी! आर्टिफिशर अ‍ॅप्रेंटीस (एए -150) आणि वरिष्ठ माध्यमिक भरती (एसएसआर -02 / 2021) बॅचच्या एकूण 2500 रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया नुकतीच भारतीय नौदलामार्फत सुरू केली होती. आज 5 मे 2021 या पदांसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. इंडियन नेव्हीच्या पोर्टलवर joinindiannavy.gov.in प्रसिद्ध केलेल्या अद्ययावत माहितीनुसार, एए-150 आणि एसएसआर-02/2021 बॅचसाठी 26 एप्रिल ते 5 मे दरम्यान अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होती. (Bumper Recruitment For 2500 Posts In Indian Navy)

अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या पात्रता

एसएसआर प्रकारात अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा संगणक विज्ञान विषयांसह 10+2 परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. मात्र, ए.ए. प्रवर्गासाठी 12 वीच्या परीक्षेत किमान 60 टक्के गुण मिळालेले असावेत. तसेच, एए आणि एसएसआर श्रेणी दोन्ही पदांसाठी उमेदवाराचे वय अर्ज करण्याच्या तारखेपासून 17 वर्षांपेक्षा कमी आणि 20 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

NHAI Recruitment : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 41 पदांसाठी मोठी भरती; आजच करा अर्ज

अर्ज कसा करावा?

अर्जासाठी उमेदवारांनी भरती पोर्टलवर joinindiannavy.gov.in भेट दिल्यानंतर, होम पेजवर दिलेल्या जॉइन एज विभागात जा आणि नंतर सेलर या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर नवीन पृष्ठावरील रजिस्टरच्या लिंकवर क्लिक करुन नोंदणी पृष्ठावर जा, तिथे तपशिलाद्वारे नोंदणी करा व येथे मागितलेला आधार क्रमांक भरा, त्यानंतर उमेदवार लॉगिनवर क्लिक करु लॉगिन पृष्ठावरील आवश्यक तपशील भरून लॉगिन करा. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपला अर्ज सादर करा.

Bumper Recruitment For 2500 Posts In Indian Navy