PGVCL मध्ये ज्युनिअर इंजिनिअर पदांसाठी बंपर भरती !

'पीजीव्हीसीएल'मध्ये ज्युनिअर इंजिनिअर पदांसाठी बंपर भरती !
Job
Jobesakal
Summary

जर तुम्ही अभियांत्रिकी क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

सोलापूर : जर तुम्ही अभियांत्रिकी (Engineering) क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. पश्‍चिम गुजरात वीज कंपनी लिमिटेड (Paschim Gujarat Vij Co. Ltd : PGVCL) ने विद्युत सहाय्यक, कनिष्ठ अभियंता-विद्युत (Vidyut Sahayak, Junior Engineer Electrical) या पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत एकूण 49 पदांची भरती केली जाईल. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार 7 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

Job
बॅंक ऑफ इंडियामध्ये नोकरीची उत्तम संधी ! 'ही' आहेत रिक्त पदे

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना वाचली पाहिजे; कारण अर्जात काही विसंगती आढळल्यास अर्ज नाकारला जाईल. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना pgvcl.com ला भेट देऊन लॉगइन करावे लागेल. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 18 ऑगस्ट 2021 पासून सुरू झाली आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी https://www.pgvcl.com/ या थेट लिंकवर क्‍लिक करा.

Job
भारतीय लष्कराने सुरू केली 'TGC-134' प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया!

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्‍ट्रिकलमध्ये BE आणि B.Tech असणे आवश्‍यक आहे. या व्यतिरिक्त शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरील अधिसूचना तपासावी लागेल.

ही आहे वयोमर्यादा

या पदांसाठी अनारक्षित श्रेणीसाठी उमेदवारांचे वय 35 वर्षे असावे. याशिवाय आरक्षित श्रेणीसाठी (एसटी/एससी/ईडब्ल्यूएस) 40 वर्षे असावी. निवड झालेल्या उमेदवाराला पाच वर्षांच्या कालावधीसाठी विद्युत सहाय्यक (कनिष्ठ अभियंता) म्हणून नियुक्त केले जाईल. यानंतर उमेदवारांची कामगिरी पाहिल्यानंतर कनिष्ठ अभियंता म्हणून नियुक्ती दिली जाईल. पदांशी संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

हे असेल शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या एसटी आणि एससी उमेदवारांना 250 रुपये (जीएसटीसह) शुल्क भरावे लागेल. तर UR आणि EWS उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com