
Business Ideas: केवळ 15 हजारांत सुरू करा हा बिझनेस, 3 महिन्यात लाखो कमवा
Business of Tulsi : प्रत्येकालाच नोकरी करायची इच्छा असते असे नाही, अनेकांना स्वतःचा व्यवसायही सुरु करायचा असतो, अनेकदा पैशांअभावी स्वतःचा बिझनेस सुरु करायला अडचण येते. पण आज आम्ही तुम्हाला असा एक बिझनेसचा पर्याय देत आहोत, ज्यात तुम्हाला फारशा भांडवलायची गरज नाही. या व्यवसायात तुम्हाला 15,000 रुपये फक्त एकदाच गुंतवावे लागतील, त्यानंतर तुम्ही 3 लाखांपर्यंत कमवू शकता. एवढेच नाही तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडूनही मदत केली जात आहे. आम्ही तुळस लागवडीबद्दल बोलत आहोत. सध्या बाजारात औषधी वनस्पतींना प्रचंड मागणी आहे. यासाठी तुम्ही कांट्रेक्टवर शेत घेऊ शकता.
औषधी वनस्पती
तुळशीची लागवड औषधी वनस्पती अंतर्गत येते. औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी मोठ्या शेततळ्याची गरज नाही किंवा मोठ्या गुंतवणुकीचीही गरज नाही. या प्रकारच्या शेतीसाठी स्वत:चे शेत असणेही आवश्यक नाही. तुम्ही ते कांट्रेक्टवर घेऊ शकता, आजकाल अनेक कंपन्या कांट्रेक्टवर औषधी वनस्पतींची लागवड करत आहेत. त्यांची लागवड सुरू करण्यासाठी, तुम्हाला फक्त काही हजार रुपये खर्च करावे लागतील, पण कमाई लाखांमध्ये आहे.
हेही वाचा: Reels बनवायला आवडतं? कमवा महिन्याचे तीन लाख, Facebook ची मोठी घोषणा
तीन महिन्यांत तीन लाखांची कमाई-
औषधी गुणधर्म असलेल्या तुळशीची लागवड केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते. तुळशीचे अनेक प्रकार आहेत, ज्यामध्ये युजेनॉल आणि मिथाइल सिनामेट असते. याचा उपयोग कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर औषधे बनवण्यासाठी केला जातो. एक हेक्टर शेतात तुळस पिकवण्यासाठी फक्त 15,000 रुपये खर्च येतो, आणि तीन महिन्यांनंतर हे पीक 3 लाख रुपयांना विकले जाते
रोपाची लागवड
तुळशीच्या लागवडीसाठी वालुकामय चिकणमाती उत्तम मानली जाते. त्याच्या लागवडीसाठी, जून-जुलैमध्ये बियाण्यांद्वारे रोपवाटिका तयार केली जाते. त्यानंतर लागवड केली जाते. ही रोपं 100 दिवसांत तयार होतात, त्यानंतर काढणी केली जाते.
पतंजली, डाबर, वैद्यनाथसारख्या आयुर्वेदिक औषधं बनवणाऱ्या कंपन्या तुळशीची शेती कांट्रेक्ट पद्धतीने करत आहेत. तुळशीच्या बिया आणि तेलासाठी मोठी बाजारपेठ आहे. दररोज तेल आणि तुळशीच्या बिया नवीन दराने विकल्या जातात.
Web Title: Business Idea Agriculture Of Tulsi Can Give You Much Profit
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..