BVoc Curriculum
sakal
अनेक विद्यार्थी थेअरीपेक्षा प्रॅक्टिकलद्वारे शिकणे पसंत करतात. अशा स्थितीत बी.व्होक म्हणजेच बॅचलर ऑफ व्होकेशनल स्टडीज हा अभ्यासक्रम ३०-४० टक्के थेअरी व ६०-७० टक्के प्रॅक्टिकलच्या माध्यमातून उत्तम संधी निर्माण करतो. या अभ्यासक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान, तांत्रिक कौशल्ये आणि उद्योगानुभव देऊन त्यांना रोजगारक्षम बनवणे हा आहे.