esakal | CA परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल; 'या' परीक्षांना 5 जुलैपासून प्रारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

CA

आयसीएआयने सीए इंटरमीडिएट, फाइनल आणि पोस्ट क्वालिफिकेशन अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

CA परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल; 'या' परीक्षांना 5 जुलैपासून प्रारंभ

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

CA Exam 2021 : आयसीएआयने सीए इंटरमीडिएट, फाइनल आणि पोस्ट क्वालिफिकेशन अभ्यासक्रमांच्या परीक्षा (examination) पुढे ढकलल्या (postponed) आहेत. या परीक्षा 5 जुलै 2021 पासून घेण्यात येणार असल्याचे संस्थेने नुकतेच जाहीर केले आहे. आयसीएआयने सीए इंटर, अंतिम आणि पीक्यूसी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत 26 मे रोजी घोषणा केली. तथापि, संस्थेने अद्याप या सर्व अभ्यासक्रम परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले नाही, परंतु आयसीएआय सीए परीक्षा 2021 सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे स्पष्ट केले आहे. (ca-exam-2021-postponed-for-intermediate-final-and-pqc-courses-icai-announces-new-examination-date-july-5)

अधिकृत सूचना पहा..

'इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया'ने (आयसीएआय) जारी केलेल्या सूचनेनुसार, सीए परीक्षा घेणारी संस्था, चार्टर्ड अकाउंटंट्स इंटरमीडिएट (ओल्ड स्कीम), इंटरमीडिएट (न्यू स्कीम), फाइनल (जुनी व नवीन स्कीम), रिस्क मॅनेजमेंट (आयआरएम), तांत्रिक परीक्षा आणि आंतरराष्ट्रीय कर आकारणी-मूल्यांकन चाचणीसाठी (आयएनटीटी-एटी) मे 2021 ची परीक्षा आता जागतिक स्तरावर 5 जुलै 2021 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.

हेही वाचा: 'Air Force'ची कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट 1 जूनपासून; 334 पदांसाठी होणार परीक्षा

25 दिवसांच्या आत वेळापत्रक होणार जाहीर

यापूर्वी आयसीएआयने 27 एप्रिल 2021 रोजी जारी केलेल्या दुसर्‍या नोटिसीत सीए परीक्षांचे पूर्व-घोषित वेळापत्रक 21 आणि 22 मे रोजी जाहीर न करता, नियोजित नवीन परीक्षेच्या तारखांचे वेळापत्रक किमान 25 दिवस आधी जारी केले जाईल. त्यानुसार संस्थेने आज सीए इंटर, अंतिम आणि पीक्यूसी अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यासाठी नवीन तारखेच्या 40 दिवस आधी माहिती जाहीर केलीय.

ca exam 2021 postponed for intermediate final and pqc courses icai announces new examination date july 5