
डी. एस. कुलकर्णी - जीवन कौशल्य प्रशिक्षक
“मनाच्या मशागतीचा जीवनाच्या सर्व क्षेत्रात उपयोग होतो. ऐकायचेय का वत्सा तुला?’’ मी राजूला विचारले.
प्रसंग असा आहे, एकदम थरारक क्षण. २०१८च्या फिफा विश्वचषकातला पोर्तुगाल विरुद्ध स्पेन असा एक सामना आणि त्यातील सर्वांत संस्मरणीय क्षण. क्रिस्टियानो रोनाल्डोचा ८८व्या मिनिटाला केलेला हॅट्ट्रिक पूर्ण करणारा तो फ्री-किक गोल. स्टेडिअममध्ये एक उत्सुक शांतता. शेवटच्या काही मिनिटांत पोर्तुगाल २-३ अशा पिछाडीवर होता. स्पेनच्या डिफेन्सने चेंडू रोखण्याचा प्रयत्न करताना, पेनल्टी एरियाच्या अगदी बाहेर, फाऊल केला. रेफरीने फ्री-किक दिली. ही संधी मिळताच रोनाल्डो पुढे आला.