बॅंक ऑफ बडोदामध्ये निघाली 198 पदांची आणखी एक भरती! | Recruitment in Bank of Baroda | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Recruitment in Bank of Baroda
बॅंक ऑफ बडोदामध्ये निघाली 198 पदांची आणखी एक भरती!

बॅंक ऑफ बडोदामध्ये निघाली 198 पदांची आणखी एक भरती!

सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये सरकारी नोकरीसाठी (Government Jobs) इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी ही गुड न्यूज. बॅंक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) ग्रामीण आणि कृषी बॅंकिंग विभाग व संपत्ती व्यवस्थापन सेवा विभागातील एकूण 105 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर एकूण 198 पदांसाठी आणखी दोन भरती जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. बॅंकेने 12 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध केलेल्या पहिल्या भरतीच्या (Recruitment) जाहिरातीनुसार, कॅश मॅनेजमेंटमध्ये (Cash Management) 53 पदांची भरती करायची आहे आणि दुसऱ्या जाहिरातीनुसार, रिसिव्हेबल मॅनेजमेंटमध्ये (Receivable Management) 145 पदांची भरती करायची आहे. बॅंक ऑफ बडोदा द्वारे जारी केलेल्या पूर्वीच्या जाहिरातीसाठी अर्ज प्रक्रिया 27 जानेवारी 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. दुसरीकडे, 12 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या दोन्ही भरती जाहिरातींशी संबंधित पात्र उमेदवारांकडून 1 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. (Recruitment for 198 posts started in Bank of Baroda)

हेही वाचा: इंजिनिअरिंग उमेदवारांसाठी हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी

रिसिव्हेबल मॅनेजमेंटमध्ये 145 पदांसाठी भरती

बॅंक ऑफ बडोदाने जारी केलेल्या रिसिव्हेबल मॅनेजमेंटमधील 145 पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरातीद्वारे ज्या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, त्यामध्ये एरिया रिसिव्हेबल मॅनेजरच्या 50 जागा, प्रादेशिक रिसिव्हेबल मॅनेजरच्या 48 जागा, झोनल रिसिव्हेबल मॅनेजरच्या 21 जागा आणि इतर पदांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार त्यांचे अर्ज बॅंक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर करिअर विभागात दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे 1 फेब्रुवारीपर्यंत सबमिट करू शकतात.

हेही वाचा: भारत सरकारच्या करन्सी नोट प्रेसमध्ये 149 पदांची भरती! 'असे' करा अर्ज

कॅश मॅनेजमेंटमध्ये 53 पदांची भरती

त्याचवेळी, बॅंकेने जारी केलेल्या कॅश मॅनेजमेंटमधील 53 पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (AVP) - इक्विजिशनची 50 पदे आणि असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (AVP) - प्रॉडक्‍टची 3 पदे आहेत. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवर प्रदान केलेल्या फॉर्मद्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात.

Web Title: Another Recruitment For 198 Posts Started In Bank Of Baroda

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top