

Career Opportunities After Civil Engineering and Architecture Graduation
esakal
करिअर म्हणजे केवळ नोकरी आणि दर महिन्याला मिळणारा पगार नव्हे. स्वतःची ओळख, आर्थिक स्थैर्य, नवीन गोष्टी शिकण्याची संधी आणि व्यावसायिक प्रगतीचा अनुभव म्हणजे करिअर. सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चरची पदवी घेतल्यानंतर चांगली नोकरी, चांगला पगार आणि भविष्यात मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळण्याची स्वप्ने अनेक तरुण पाहतात. मात्र पदवी मिळाल्यानंतर योग्य नोकरी, योग्य भूमिका आणि करिअरची दिशा शोधताना अनेकजण संभ्रमात पडतात.