

The Hidden Burden of Unrealistic Career Expectations
sakal
रीना भुतडा (करिअर समुपदेशक)
नवी क्षितिजे
करिअर समुपदेशक म्हणून गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवात दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे अहवाल मला तपासायला मिळाले आहेत. दररोज विविध कुटुंबांना, पालकांना भेटून मी त्यांचे प्रश्न ऐकते, विद्यार्थ्यांच्या मनातील गोंधळ समजून घेण्याचा प्रयत्न करते. या दीर्घ प्रवासात विद्यार्थ्यांचे मोठे यश पाहिले आहे, तसेच चुकीच्या अपेक्षांचा भार वाहिल्याने त्यांना आलेल्या अपयशाच्या वेदनाही जवळून अनुभवल्या आहेत.