

Understanding Career Choices After 10th
sakal
रीना भुतडा ( करिअर समुपदेशक )
नवी क्षितिजे
हावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना बोर्डाच्या परीक्षांचे वेध लागले आहेत. त्याचबरोबर अकरावी - बारावीसाठी शाखेची निवड, क्लास, बोर्ड, प्रवेश परीक्षा याविषयीही मनात अनेक प्रश्न आहेत. उत्सुकता, आशा, भीती आणि संभ्रम अशा संमिश्र भावना या टप्प्यावर स्वाभाविकपणे असणारच. मात्र, करिअरची निवड ही केवळ गुणांवर किंवा प्रचलित ‘स्कोप’वर आधारित न ठेवता, विद्यार्थ्याची स्वतःची ओळख लक्षात घेऊन केल्यास ती अधिक यशस्वी ठरते.