Career Tips After 10th & 12th: 10वी-12वी झालीये? पण कोणतं करिअर निवडायचं समजत नाहीये? मग 'या' टिप्स नक्की फॉलो करा...

How to Choose the Right Career: 10वी-12वी झाल्यावर करिअर निवडताना पालक आणि विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी या टिप्स नक्की फॉलो करा.
How to Choose a Career after SSC and HSC
How to Choose a Career after SSC and HSCsakal
Updated on

Tips To Choose Right Career After 10th And 12th: घरात बाळ जन्माला आलं की, त्याला पाहून हा डॉक्टर, इंजिनीअर होणार, हा घरचा व्यवसाय सांभाळणार असे ठरवले जाते. कारण प्रत्येकालाच आपल्या पाल्याच्या करिअरची काळजी असते.

त्यामुळे सुज्ञान पालक मुलांसाठी योग्य ते करिअर निवडतात. पण, काही पालकांना मुलांचे शिक्षण, त्यांचा कल कोणत्या क्षेत्रात आहे, हे समजत नाही. त्यामुळे आधी शिक्षणाचे आणि नंतर करिअरचे तीन तेरा वाजतात. त्यामुळे करिअर निवडताना विशेष काळजी घ्यायला लागते.

प्रत्येकालाच करिअरची चिंता असते. त्यामुळे लोक मिळेल ते काम करायला लागतात. आणि काही दिवसांनी ते सोडून देतात. काहींना करायचे असते एक आणि केवळ घरची परिस्थिती आणि कुटूंबातील लोकांचे हट्ट यामुळे ते भलत्याच क्षेत्राची निवड करतात.

काही तरूण आपल्यासाठी काय योग्य हे माहिती नसल्याने चुकून दुसऱ्या क्षेत्रात जातात. त्यामुळे आज अशा 5 गोष्टी पाहुयात ज्या तूम्हाला बेस्ट करिअर निवडायला मदत करतील.

करिअरचे प्लॅनिंग

कोणत्याही क्षेत्राची निवड करताना त्या क्षेत्राबद्दल आधी संपूर्ण माहिती घ्या. आणि मगच करिअर निवडा. कोणत्या क्षेत्रात नोकरी करायची आहे त्यासाठी शिक्षण, त्याचे क्लास, बेस्ट कॉलेज, त्याचा खर्च याचा विचार करून त्यानूसार वाटचाल करा.

स्किल डेव्हलपमेंट

आजकाल एखाद्याची डिग्री महत्त्वाची नाही तर त्याच्या एक्स्ट्रा ऍक्टीव्हीटी महत्त्वाच्या आहेत. तरूणांमध्ये इंजिनीअरींग आणि त्याच्याशी संबंधित कोर्स, संभाषण कौशल्य हे पाहिले जाते. त्यामुळे केवळ डिग्री मिळवण्याच्या मागे पळू नका. कॉलेज करत असतानाच विविध क्लास, नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करा.

आवड ओळखा

काही लोक त्यांची आवड काय आहे याचा विचार न करता. केवळ पॅकेज चांगले आहे किंवा मित्राने ते क्षेत्र निवडले म्हणून आपणही तिकडेच जायचे असे करू नका. त्यामुळे मनासारखे काम नसल्याने कामात यश मिळत नाही.

अपडेटेड रिज्युम

मुलाखतीमध्ये तूमच्यापेक्षा तूमचा रिज्युम अधिक बोलतो,असे म्हणतात. त्यामुळे तो नेहमी अपडेट ठेवा. त्यात सगळी माहिती तपशीलवार लिहा. रिज्युम आकर्षक असला पाहिजे.

कामाची पद्धत

कोणतेही करिअर निवडण्यापूर्वी तुमच्या कामाच्या पद्धतीकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्हाला डेडलाइनवर काम करता येत असेल तर तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात जाऊ शकता.

त्यासाठी तूम्ही परफेक्ट आहात.पण, स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता, आणि घेतलेला निर्णयासाठी जीवाचे रान करण्याचा स्वभाव असेल तर तूम्ही चांगला बिझनेसमन होऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com