Communication Skills | प्रभावी संभाषण कौशल्य आत्मसात करण्यासाठी हे नियम पाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Communication Skills

Communication Skills : प्रभावी संभाषण कौशल्य आत्मसात करण्यासाठी हे नियम पाळा

मुंबई : एकविसाव्या शतकातील संवादाचे महत्त्व यावरून कळू शकते की, प्रत्येक कंपनी किंवा संस्था कोणालाही कामावर घेण्यापूर्वी संभाषण कौशल्य तपासते आणि उत्तम कौशल्य असलेल्या उमेदवाराची निवड करते.

संभाषण आपल्या वाढीमध्ये आणि विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि आपल्याला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरित करते. एवढेच नाही तर उत्तम संभाषण कौशल्ये आपला आत्मविश्वास वाढवतात. म्हणूनच संवाद कौशल्य सुधारणे ही आपल्या सर्वांची प्राथमिकता असायला हवी. (Communication Skills)

१. चांगले ऐका

एक चांगला संवादक होण्यासाठी, प्रथम तुम्हाला चांगले ऐकायला शिकावे लागेल. जेव्हा एखादी व्यक्ती दुर्लक्ष करते तेव्हा संवादात व्यत्यय येतो. चांगले ऐकून, तुम्ही संवादाच्या प्रत्येक महत्त्वाच्या तपशीलात प्रवेश मिळवता आणि संवाद कसा सुधारायचा ते शिकता.

२. मुद्देसूद बोला

बर्‍याच संभाषणांमध्ये जेव्हा जास्त प्रमाणात अनावश्यक माहिती असते तेव्हा गोंधळ होतो. संभाषण करताना मुद्देसूद बोला. हे लिखित आणि तोंडी संभाषण दोन्हीवर लागू होते. विषयापासून विचलित होऊ नका.

३. तुमचे प्रेक्षक जाणून घ्या

आपण कोणाशी संवाद साधत आहात हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या श्रोत्यांनुसार भाषेचा वापर केला नाही, तर तुम्ही तुमचे शब्द तुमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवू शकणार नाही. म्हणून, संवादापूर्वी, तुमचे प्रेक्षक कोण आहेत याची विशेष काळजी घ्या.

४. देहबोली

देहबोली हा शब्दांशिवाय संवाद साधण्याचा उत्तम मार्ग आहे पण तरीही त्याचा खोलवर परिणाम होतो. जेव्हा तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्स कॉल किंवा समोरासमोर भेटत असता तेव्हा सकारात्मक देहबोली राखा आणि तुमच्या श्रोत्याच्या नजरेला नजर देऊन बोला. तुमची देहबोली देखील संवादाचा एक उत्तम मार्ग आहे.

५. तुमचा सूर तपासा

संवादात सुराला खूप महत्त्व आहे. बर्‍याचदा तुम्ही मोठ्या आवाजात बरोबर बोलता, मग त्याचा संदेश चुकीचा जातो. म्हणूनच हे नक्की लक्षात ठेवा की तुम्ही संवाद साधत असताना तुमचा स्वर खूप मधुर आणि आवाज मऊ असावा. यामुळे ऐकणारा तुम्हाला आरामात ऐकू शकेल आणि तुम्ही न थांबता तुमचे म्हणणे मांडू शकाल.

६. थेट बोला

ज्या व्यक्तीशी तुमचे चांगले संबंध आहेत त्यांच्याशी नेहमी थेट बोला. थेट बोलण्याने सर्व गोंधळ आणि कोंडी दूर होते. जेव्हा कोणताही गोंधळ नसतो तेव्हा नातेही चांगले राहाते. पण परिस्थिती पाहूनच बोला याकडेही विशेष लक्ष द्या.

Web Title: Communication Skills Follow These Rules To Acquire Effective Communication Skills

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..