Career In NDA : एनडीएच्या परीक्षेची तयारी कशी करावी? इथे वाचा टिप्स

एनडीए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी हा तरूणांसाठी करियरचा उत्तम पर्याय ठरू शकतो. अनेक मुले देशाची सेवा करता यावी म्हणून हे क्षेत्र निवडतात.
Career In NDA
Career In NDA esakal

Career In NDA : १९४९ मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) ची स्थापना झाली होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे इमारतीची कोनशिला बसवण्यात आली. एनडीए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी हा तरूणांसाठी करियरचा उत्तम पर्याय ठरू शकतो. अनेक मुले देशाची सेवा करता यावी म्हणून हे क्षेत्र निवडतात.

एनडीएचे कार्य

नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी ही संस्था विशेषत: लष्कर, हवाई दल आणि नौदल या तीन सेवांसाठी योग्य उमेदवार शोधण्याचे काम करते. प्रत्येक विद्यार्थ्याला अर्जासाठी तीन संधी देण्यात येतात. चला तर एनडीएच्या तयारीसाठीच्या काही टिप्स जाणून घेऊयात.

एनडीएसाठी पात्रता

भारतातील कोणत्याही श्रेणीतील विद्यार्थी ज्यांचे वय 16.6 ते 19 वर्षे आहे, ते एनडीमध्ये सामील होऊ शकतात. एनडीए परीक्षेद्वारे, तुम्ही अधिकारी बनून भारताच्या तीन सैन्यांपैकी कोणत्याही एका सैन्यात सामील होऊ शकता.

एनडीएच्या परीक्षेची तयारी

एनडीएची परीक्षा ही विज्ञान विषयावर आधारित असते. तेव्हा एनडीएसाठी लागणाऱ्या अभ्यासक्रमाची पुरेशी माहिती गोळा करणे गरजेचे आहे. पुण्यातील खडकवासला येथे ब्रिटीश साम्राज्याच्या काळात भारतीय सैन्याला आधुनिक पातळीवर नेण्याच्या मुख्य उद्देशाने एनडीए संस्था स्थापन करण्यात आली होती. एनडीए परीक्षेची रचना केंद्रीय पोलीस सेवा आयोगाने केली असून दरवर्षी ही परीक्षा दोनदा घेतली जाते.

Career In NDA
Defence News : जगात भारतीय शस्त्रास्त्रांचा डंका, आता 'हा' देश खरेदी करणार 'ब्रह्मोस'

अर्ज कसा करायचा?

एनडीमध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराने गणित विषयातून बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. 55% पेक्षा जास्त गुण असलेले उमेदवार NDA परीक्षेचा फॉर्म भरण्यास पात्र आहेत. राष्ट्रीय संरक्षण अकादमी स्पर्धा परीक्षा फॉर्म दरवर्षी जून आणि डिसेंबर महिन्यात निघतात. तुम्ही फॉर्म युनियन लोकसेवा आयोगाच्या (UPSC) च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकता.

एनडीएची परीक्षा ११ वी आणि १२ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असते. पहिला पेपर गणिताचा आणि दुसरा पेपर जनरल अवेअरनेसवर असतो.

Career In NDA
Defence News : सैन्याची ताकद वाढणार! सरकारची 70,000 कोटींच्या शस्त्रास्त्र खरेदी प्रस्तावांना मंजुरी

एनडीएची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या

  • १० वी बोर्डाची परीक्षा होताच एनडीएची तयारी सुरू करा.

  • ११ वी १२ गणिताचे कॉन्सेप्ट्स क्लियर असावेत.

  • NCERT च्या पुस्तकांचा अभ्यास करा.

  • पूर्वीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवून बघा.

  • सामान्य ज्ञानाकडे विशेष लक्ष द्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com